‘भंडारदरा’च्या टेलची चारी पुन्हा फुटली; शेकडो एकर शेतीमालाचे नुकसान

दैनिक दिव्य मराठी :- भंडारदरा धरणाच्या टेलची चारी कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे पुन्हा एकदा फुटल्याने शेकडो एकर शेतीमालाचे नुकसान झाले आहे. याबाबत झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी, तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
भंडारदरा धरणातून यावेळीसुद्धा हक्काचे पाणी शेवटपर्यंत नेवासे बुद्रूकच्या शिवारापर्यंत आले आहे. पण वर्षानुवर्षे या भागाकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने चाऱ्यांची कामे निकृष्ट झालेली आहेत. या चारीमध्ये गेल्या ४८ तासापूर्वी जोगेश्वरी मंदिराजवळ ही चारी फुटली आहे. मागील रोटेशनच्या वेळी देखील याच ठिकाणी चारी फुटली होती. पण त्यावेळी जास्त नुकसान झाले नव्हते.

चारीच्या शेवटच्या टोकाला असलेल्या नेवासे बुद्रूक शिवारातील गट क्रमांक १०४८-१ १०४८-२ मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसले आहे. या परिसरामध्ये ऊस क्षेत्र नाही. या खरीप क्षेत्रात सर्व शेतकरी ज्वारी, बाजरी आणि हरभऱ्याच्या पिकावर अवलंबून असतात आणि त्यामुळे त्यांची सर्व भिस्त याच पिकांवर असते.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
ही चारी फुटल्यामुळे शेकडो एकर परिसरात पाणीचपाणी झाले आहे. कारण अधिकाऱ्यांना सांगूनही ४८ तासात सदरच्या चारीचे पाणी थांबले नव्हते. अखेर संतापलेल्या शेतकऱ्यांनी संबंधित कर्मचारी अधिकाऱ्यांना जाब विचारला असता आम्ही वर कळवले असे उत्तर मिळाले. 

या परिसरात राजेंद्र नारायण मारकळी, किशोर गावडे, नीलेश जोशी, मुक्ताबाई धोत्रे, ज्ञानेश्वर सुरवसे, बाबासाहेब डौले, प्रवीण मारकळी, सुनील मारकळी, सोपान सुरवसेे, नामदेव डौले, भानुदास गवळी यांचे क्षेत्र आहे. हे सर्व पाटबंधारे खात्याच्या कारभारावर संतापले आहेत. त्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.