पारनेर तालुक्यातील ढवळपुरीजवळ अपघातात दाम्पत्य ठार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-पारनेर तालुक्यातील ढवळपुरी ते भाळवणी दरम्यान ढवळपुरीच्या घोडके वस्ती नजीक ट्रक व मोटारसायकलची धडक होऊन मोटारसायकल वरील सावळेराम भिकाजी भनगडे व सौ. परिघा सावळेराम भनगडे हे पती-पत्नी जागीच ठार झाले. अपघातानंतर ट्रकचालक ट्रक घेऊन फरार झाला.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
याविषयी सविस्तर माहिती अशी की, ढवळपुरी येथील भनगडे दापत्य भाळवणीहून ढवळपुरीकडे शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलवरून (एमएच १७ सी.वाय. ९१३१) जात असताना समोरून येणाऱ्या (एमएच १२ ए.क्यू. १०८७) या ट्रकची जोरदार धडक झाल्याने हे दोघे पती-पत्नी जागीच ठार झाले.

या घटनेची माहिती ढवळपुरीचे सरपंच डॉ. राजेश भनगडे यांनी पारनेर पोलीस स्टेशनला कळविली. ही माहिती मिळताच पोलीस हेड कॉन्स्टेबल आण्णासाहेब चव्हाण व पोलीस कॉन्स्टेबल पवार हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर दोन्हीही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पारनेर येथे पाठविण्यात आले. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
ट्रकचालक घटना घडल्यानंतर ट्रक घेऊन परार झाला. पुढील तपास पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल आण्णासाहेब चव्हाण व पोलीस कॉन्स्टेबल पवार हे करीत आहेत. दरम्यान या अचानक घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे ढवळपुरी येथील आठवडे बाजार दुपारी ४ वाजता बंद करून बाजारपेठ बंद ठेवून सार्वजनिक दुखवटा पाळण्यात आला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.