अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील भुसानगर येथी एका १२ वर्षाच्या मुलीला चॉकलेटचे अमिष दाखवून तुला तुझ्या पाहुण्यांनी बोलावले असे सांगितले. तसेच तिची छेड काढून तिला उचलून घेऊन जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या नराधमाचा असलेला अपहरणाचा प्रयत्न सतर्क नागरिकांमुळे फसला.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
सविस्तर वृत्त असे की, शिर्डी-सुरत राज्य मार्गालगत सुरेगाव बसस्थानकाजवळ दुपारी एक वाजेच्या दरम्यान व्यंकटेश भुजबळ व परवेज मनियार हे दुचाकीवरून स्थानकाच्या रस्त्याने जात असताना येथील किराणा दुकानासमोर एक मुलगा मुलीची छेड काढत होता.

तिला बळजबरीने चॉकलेट खाण्यास देत होता. परंतु, मुलगी त्याच्या या कृत्यास विरोध करीत असल्याचे भुजबळ व मनियार यांच्या लक्षात आले. त्यांनी त्या छेड काढणाऱ्या मुलाला विचारणा केली. परंतु, त्याला निट बोलताही येत नव्हते. तो मुलीचा हात सोडण्यासही तयार नसल्याने त्याला चोपही देण्यात आला असता तो शुद्धीवर आला. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
मुलगी रडत 'मला माझ्या आईकडे घेऊन चला' अशी विनवणी करत होती. ही वार्ता भुसानर परिसरामध्ये वाऱ्यासारखी पसरली. त्याच्यसोबत आणखी एक मुलगा होता, परंतु, तो पळून जाण्यात यशस्वी झाला. येथील नागरिकांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तो मिळाला नाही. त्यामुळे या एका तरुणाला झाडाला बांधून ठेवण्यात आले. तसेच पोलिसांना पाचारण करण्यात आले. परंतु, नेहमीप्रमाणे पोलीस घटनास्थळी उशिरा पोहचल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.