गुन्हेगारांनो सावधान...! लोणीवर आता सी.सी.टी.व्ही.ची करडी नजर.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राज्याचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून, लोणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक रणजीत गलांडे यांच्या पुढाकाराने व लोणी ग्रामस्थांच्या सहभागातून लोणी बुद्रुकमध्ये सुमारे साडेचार लाख रुपये खर्चून सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात आले आहेत. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
त्याचे उद्घाटन डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते झाल्यानंतर सर्व कॅमेरे कार्यान्वीत करण्यात आले. त्यामुळे आता 'गुन्हेगारांनो सावधान' ना. विखे पाटलांच्या लोणीवर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याची करडी नजर असणार आहे.

सर्वत्र वाढत चाललेली गुन्हेगारी व चित्रपटातून दाखविली चोरीची दृष्ये प्रत्यक्षात उतरवत अद्ययावत फंडा वापरून सुरु असलेल्या गुन्हेगारीवर आळा बसावा या दृष्टीने लोणीमध्ये आता सीसीटीव्ही कॅमेरे तैनात करण्यात आले आहेत. लोणी ग्रामपंचायतमध्ये त्याचे उद्घाटन विखे कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
पद्मश्री विठ्ठलराव विखे, पद्मभूषण बाळासाहेब विखे, राज्याचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदच्या अध्यक्षा शालिनीताई विखे व विखे कारखान्याचे अध्यक्ष डॉ सुजय विखे या विखे कुटुंबाने समाजकारणातून राजकारणाचा वारसा निर्माण केला. 

याच सामाजिक सुरक्षेच्या दूरदृष्टीतून व गुन्हेगारांना जरब बसावी या उद्देशाने लोणी ग्रामस्थांच्या सहभाग आणि लोणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक रणजीत गलांडे, भालचंद्र शिंदे व सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या पुढाकारातून गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे चहुबाजूने तैनात करण्यात आले आहेत. लोणीतील सराफ बाजार, आठवडे बाजार, बैल बाजार, मुख्य रस्त्याच्या दुतर्फा, मुख्य चौक, व्यापारी पेठ व वर्दळीच्या ठिकाणी सदर कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे गावातील गुन्हेगारीवर आळा बसण्यास मदत होणार आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.