श्रीगोंदा तालुक्यात सरपंच पदाच्या ८ जागांसाठी २७ उमेदवार रिंगणात

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :तालुक्यातील आठ ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदासाठी २७ उमेदवार तर सदस्य पदासाठी एकूण २०८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. आठ ग्रामपंचायतीमध्ये सदस्य पदासाठी ४०० अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी सदस्य पदाच्या शर्यतीतून १८७ ज़णांनी माघार घेतली आहे. सरपंच पदासाठी ७७ अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी ५० जणांनी आज माघार घेतली. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
आनंदवाडी २, टाकळी लोणार २, देवदैठणमध्ये १ जागा बिनविरोध अशा एकूण ५ जागा बिनविरोध झाल्या आहेत. तालुक्यातील कोळगाव ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी धस प्रतिभा विलास, काळे वर्षा अमोल, सातपुते नंदिनी नामदेव, धस शोभा शिवदत्त हे चार उमेदवार तर ६ प्रभागांमध्ये सदस्य पदासाठी ३७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 

टाकळी लोणार ग्रामपंचायतमध्ये सरपंचपदासाठी ३ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये शिंदे नवनाथ केरबा, शिंदे गणेश शिवाजी, जगदाळे सुनील दिनकर. ४ प्रभागांमध्ये सदस्य पदासाठी २० उमेदवार निवडणूक लढवत आहेत. या ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्र ४ मधील दोन्ही जागा बिनविरोध झाल्या असून, गोडसे अशोक लक्ष्मण, जगदाळे रुपाली राहुल हे दोन सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. 

विसापूर ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी ३ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये जठार अरविंद भास्कर, जठार सोपान नारायण, जठार रमेश दत्तात्रय. तीन प्रभागांमध्ये सदस्य पदासाठी २१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. आधोरेवाडी ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी लकडे मनीषा भीमराव, लकडे संध्या अजित हे २ उमेदवार रिंगणात आहेत. तीन प्रभागांत सदस्य पदासाठी 16 उमेदवार रिंगणात आहेत. 

मढेवडगाव ग्रामपंचायत सरपंच पदासाठी महानंदा फुलसिंग मांडे, सुरेखा प्रमोद शिंदे व सुरेखा प्रकाश उंडे हे तीन उमेदवार आहेत. सदस्य पदासाठी पाच प्रभागांमध्ये ४० उमेदवार निवडणूक लढवत आहेत. आनंदवाडी ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी नलावडे सुदाम तुकाराम व भोयटे शांताराम पांडुरंग हे दोन उमेदवार आहेत.४ प्रभागांत सदस्य पदासाठी २० ज़ण रिंगणात असून, येथे प्रभाग क्र.२ मध्ये दोनच अर्ज राहिल्यामुळे या जागा बिनविरोध झाल्या आहेत. माळी ज्ञानेशवर गणपत, खरात मनीषा हौशीराम हे दोन उमेदवार बिनविरोध झाले आहेत.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
पेडगाव ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी सहा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ते याप्रमाणे- कणसे सुलोचना भगवान, पवार चंदाबाई रोहिदास, पिरजादे सोनम इरफान, पवार शीतल अशोक, गोधडे संगीता भाऊसो व ढगे आशा प्रवीण यांचा समावेश आहे. पाच प्रभागांत ३५ उमेदवार सदस्य पदाची निवडणूक लढवत आहेत. 

देवदैठण ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी असलेले ४ उमेदवार याप्रमाणे - वाघमारे सुभाष रामा, भवर सुनीता शांताराम, गुंजाळ जयश्री विश्वास व लोखंडे सुरेश दत्तात्रय. ४ प्रभागात सदस्य पदासाठी २४ ज़ण निवडणूक लढवत आहेत. प्रभाग क्र.1 मध्ये लोखंडे नंदा कांतीलाल या बिनविरोध झाल्या आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.