कोपरगावमध्ये रेशनचा काळाबाजार उघड.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कोपरगाव शहरातील विकास सोसायटीच्या स्वस्त धान्य दुकान नं.8 या दुकानामध्ये काळ्या बाजाराने शासकीय स्वस्त धान्य विक्री करताना आढळुन आल्याने त्यांच्यावर कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
याबाबत पोलीसांकडुन मिळालेली माहिती अशी की, विक्रेता देवराम पी ढंगारे हे सोमवार दि. 11 डिसेंबर रोजी दुपारी 2ः30 ते 4 वाजण्याच्या सुमारास दुकानामध्ये शासकीय धान्य त्यात 4 हजार 370 रूपये किंमतीचा 607 किलो गहु, 3 हजार 542 रूपये किमतीचा 369 किलो तांदुळ व 340 रूपये किमतीची 17 किलो साखर असा 8 हजार 253 रूपये किमतीचा अतिरिक्त धान्यासाठी ठेवुन काळया बाजाराने विक्री करीत असल्याचे दिसुन आल्याने अतिरिक्त धान्य साठा जप्त करून ढंगारे यांना अटक करण्यात आली आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
दरम्यान, तालुका पुरवठा निरीक्षक सोमनाथ बाबुराव मोरे यांच्या तक्रारीवरून देवराम ढंगारे यांच्या विरोधात जीवनावश्‍यक वस्तु अधिनियम 1955चे कलम 3व 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आहे. या घटनेचा आधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भरत मोरे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.