मित्राच्या वाढदिवसाची पार्टी बेतली जिवावर...

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नरसाळी-बेलापूर रस्त्यावर नरसाळी खुर्दजवळ बुधवारी (दि. १३) रात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास दोन कार व टँकरच्या भीषण अपघात झाला. यात श्रीरामपूर तालुक्यातील पाच तरुणांचा मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर नगर येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात टॅँकर व इंडिका कारच्या चालकाविरूद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर हे दोघेही पसार झाले.


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
सचिन रघुनाथ तुपे (वय २९), भारत विश्वनाथ मापारी (वय २५, दोघे रा. भैरवनाथनगर, ता. श्रीरामपूर), नितीन सुधाकर सोनवणे (वय २८), शिवाजी झुंबरनाथ ढोकचौळे (वय ३०, दोघेही रा. रांजणखोल, ता. राहाता), सुभाष बाळासाहेब शिंदे (वय ३२, ब्राह्मणगाव वेताळ, श्रीरामपूर) यांचा मृतांमध्ये समावेश आहे. तर पियुष घनश्याम पांडे (रा. भैरवनाथनगर) हा या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. 

दरम्यान, अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. तसेच अशोक गवते यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. बेलापूर पोलीस चौकीचे उपनिरीक्षक रितेश राऊत, अतुल लोटके, गणेश भिंगारदे, बाळासाहेब गुंजाळ, अर्जुन पोकळे हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सर्वांना गाडीतून बाहेर काढले. तसेच गाडीतील जखमींचे नातेवाईक भारत संपत तुपे व रोहिदास रामदास तुपे हे दोघे याठिकाणी आले. त्यांनी पोलिसांच्या मदतीने जखमींना प्रथम राहुरीला व नंतर श्रीरामपूर साखर कामगार रूग्णालयात हलविले, असता तपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पाचही जणांना मृत घोषित केले. 

--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
तर पियूष पांडे हा गंभीर जखमी असल्याने त्याला उपचारार्थ नगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शवविच्छेदन झाल्यानंतर पाचही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी हवालदार अतुल लोटके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी टँकर व इंडिका कार चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दत्तनगरला कापला केक?.
अपघातातील मृतांच्या एका खास सहकाऱ्याचा काल वाढदिवस होता. रात्री दत्तनगर येथे केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर हे सर्वजण देवळाली-नरसाळी रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये पार्टी करण्याकरिता गेले होते. याठिकाणी पार्टी आटोपून सर्वजण श्रीरामपूरच्या दिशेने परत असताना हा भीषण अपघात झाल्याची चर्चा यावेळी होती. या हॉटेलपासून हे अंतर अवघ्या पाच ते दहा मिनिटांच्या अंतरावर असल्याने काही क्षणापूर्वी आनंदात असणारे या सर्व मित्रांवर हा दु:खद प्रसंग उद्भवला.

गर्दीतही निरव शांतता!.शवविच्छेदनाप्रसंगी शवागृह परिसरात दोनशे ते तिनशे तरूण उपस्थित होते. त्यात काही युवक महाविद्यालयातूनच परस्पर आल्याचे त्यांच्याकडील बॅगांवरून दिसून येत होते. एवढ्या मोठ्या संख्येने जमाव असला तरी आपल्यातील पाच जणांचा एकाचवेळी अपघाती मृत्यू झाल्याने निरव शांतता होती.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
                                                  --------------------------------
Powered by Blogger.