वीजवाहक खांबावर तरुण चढल्यामुळे गोंधळ.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :एका समाजाच्या गटात भांडणे सुरू असताना रागाच्या भरात एक तरुण वीज़ वाहक खांबावर चढल्याने शहरात एकच गोंधळ उडाला. आज बुधवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. शेवटी काही नागरिक आणि पोलिसांनी प्रसंगावधान राखत वीजपुरवठा खंडित करून या तरुणाला खाली उतरवले आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
याबाबतची माहिती अशी की, आज़ सायंकाळी एका समाजाच्या गटात तहसील कार्यालयाच्या आवारात भांडणे सुरू होती. भांडणाच्या कारणातून हा तरुण वीज़वाहक खांबावर चढला व तो वाहक तारांना हाथ लावण्याची धमकी देत होता. शहरातील तहसील कार्यालय, शानी चौक, पोलीस स्टेशनच्या मागे काही ठराविक समाजाच्या लोकांची कायम वर्दळ असते. त्यांच्यात अनेकवेळा वाद, भांडणे सुरू असतात. 

तीन दिवसांपूर्वीच श्रीगोंदा शहरातील बाह्यवळण रस्त्यालगत या समाज़ाच्या लोकांमध्ये वाद होऊन एकमेकांवर तुफान दगडफेक केली होती. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने वाद टळला. आज बुधवार रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास एका समाज़ाच्या गटात भांडणे सुरू झाली. या भांडणातून हा तरुण विज़ेच्या खांबावर चढला. व तो विजेच्या तारांना हाथ लावण्याची धमकी देऊ लागला. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
यामुळे येथे नागरिकांची गर्दी ज़मली. लोकांनी त्याला खाली उतण्याची विनंती केली. मात्र, तो एकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. या वेळी काही महावितरण कंपनीच्या कार्यालयात फोन करून माहिती दिली. शेवटी वीजपुरवठा खंडित करून पोलिसांच्या मदतीने त्या तरुणाला खाली उतरवण्यात आले. त्यानंतर पुन्हा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.