वसतीगृहातील गरजू विद्यार्थ्यांच्या अनवाणी पायांना शालेय बुटची भेट.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राजकारण करताना समाजकारणला महत्त्व देवून, राष्ट्रवादीच्या माध्यमातून वंचित घटकांना मदतीचा हात दिला जातो. शिक्षणाने बदल घडणार असून, आजचे विद्यार्थी हे उद्याचे भविष्य आहे. त्यांच्या सर्वांगीन विकासासाठी राष्ट्रवादीच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते यांनी केले.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
 राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसा निमित्त सावेडी येथील सेंट हिल्दा बोर्डिंग वसतीगृहात गरजू विद्यार्थ्यांना शालेय बुट व मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रा.विधाते बोलत होते. याप्रसंगी शहर जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष राहुल पाटोळे, सरचिटणीस प्रशांत पगारे, उद्योजक विशाल गायकवाड, सचिन ठोसर, कुमार लोंढे, सिसिल भगत, किरण मते, जॉन गायकवाड, शुभम भिंगारदिवे, मायाताई जाधव, शैला कांबळे आदि उपस्थित होते.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
राहुल पाटोळे यांनी सण, उत्सव व वाढदिवसा निमित्त इतर खर्चांना फाटा देवून गरजू घटकांना मदत केल्यास ते सत्पात्री ठरते. शरद पवार साहेबांनी नेहमीच वंचित व सर्वसामान्य घटकांना केंद्रबिंदू मानून कार्य केले असून, त्यांच्या विचारांच्या प्रेरणेने हे उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सेंट हिल्दा बोर्डिंग वसतीगृहात वंचित घटकातील विद्यार्थी शिक्षणासाठी वास्तव्यास आहे. या विद्यार्थ्यांची गरज ओळखून त्यांना शालेय बुट भेट देण्यात आले. पादत्राणे व मिठाईची भेट मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.