जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे अभंगाचे विडंबन केल्यास अ‍ॅडमीन वर गुन्हा दाखल करावा

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील शेवटचे चरण तुका म्हणे.... असे लिहुन, चित्र विचित्र मेसेज टाकुन अभंगाचे विडंबन केल्यास अ‍ॅडमीन वर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी युवक प्रबोधन समितीचे अध्यक्ष ह.भ.प. सिध्दीनाथ मेटे महाराज यांनी सहाय्यक पोलीस आधिक्षक डॉ.अक्षय शिंदे यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
 यावेळी युवक प्रबोधन समितीचे सल्लागार अशोक झोटिंग, महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष भगवान श्रीमंदिलकर, लोकसत्ता संघर्षचे प्रकाश साळवे, विठ्ठल शिंदे, प्रकाश मिरपगार, लालय्या विद्ये, अविनाश पठारे आदी मान्यवर उपस्थित होते.

संपुर्ण महाराष्ट्राचे व वारकरी सांप्रदायाचे पुज्यस्थान असलेले जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी आपल्या गाथेतील अभंगाच्या माध्यमातून संपूर्ण समाजाचे प्रबोधन करुन परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. याच अभंगाच्या गाथेतील एका अभंगावर आयुष्यभर पि.एच.डी.करुन देखील अर्थ सहजासहजी उमगत नाही व त्याच अभंगाच्या आधारे अनेक कीर्तनकार, प्रवचनकार आज देखील समाजाचे प्रबोधन करण्याचे काम करत आहेत. 

गाथेतील अभंगाचा शब्दरुपी खेळ करुन काही लोक समस्त वारकरी सांप्रदाय व जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या अनुयायांच्या भावना दुखावत आहेत. “तुका म्हणे ऍडमिन पार्टी देतोय का?” किंवा “तुका म्हणे न्यू इयरची लागली आस” या सारखे मेसेज व्हाटसअ‍ॅप ग्रुपवर येत आहेत. 

चित्र-विचीत्र चिन्हे वापरुन सर्व ग्रुपवर शेअर होत आहेत, असे मेसेज टाकाणार्‍यांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी युवक प्रबोधन समितीचे अध्यक्ष ह.भ.प. सिध्दीनाथ मेटे महाराज यांनी सहाय्यक पोलीस आधिक्षक डॉ.अक्षय शिंदे यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जगाच्या कल्याणासाठी तुकाराम महाराजांनी अभंग गाथा लिहीली, त्या अभंगांची विटंबना होणे उचीत नाही. असा प्रकार आढळून आल्यास संबधित व्यक्ती आणि गृपच्या अँडमिन यांसह समर्थन करणार्‍या सदस्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. सदर प्रकारचे मेसेज प्रत्येक वारकर्‍यांनी सर्व व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर पोहचवावे असे आवाहन ही करण्यात आले आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
जेणेकरुन जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या अभंगावरील होणारे विडंबन थांबेल. अन्यथा “भले तरी देऊ कासेची लंगोटी॥ नाठाळाचे माथी हाणु काठी॥” या अभंगा प्रमाणे सदरील ग्रुप अ‍ॅडमीन व पोस्ट टाकणार्‍या सदस्यावर धार्मिक भावना दुखवल्याबद्दल भारतीय दंडविधान कलम 295 तसेच सायबर क्राईम अ‍ॅक्टच्या तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा असे निवेदनात म्हटले आहे. 

असे मेसेज पाठवणार्‍यांना वेळीच समज देऊन सहकार्य करावे. असा अनुचित प्रकार टाळण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्यामार्फत अथवा सायबर गुन्हे शाखेमार्फत अशा सुचना करण्यात याव्यात. तसेच सत्यता पडताळून संबधितावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. 

यासंर्दभात समितीच्या वतीने तक्रार दिली जाईल, तरी यासंर्दभात योग्य ती कायदेशीर दखल घ्यावी व शहरातील कायदा सुव्यवस्था आबादीत रहाण्यासाठी प्रयत्न करावेत असे निवेदनात म्हटले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.