व्यापाऱ्यास ५ लाखांच्या खंडणीची मागणीप्रकरणी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांविरूध्द गुन्हा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जामखेड येथील मार्केट कमीटीमधील व्यापारी राहुल बेदमुथ्था यांच्याकडे मार्केट कमीटीमध्ये उडीदासंबंधित केलेली तक्रार मागे घ्यायची असेल तर पाच लाख रुपयांची खंडणी मागीतल्याप्रकरणी संभाजी ब्रिगेडचे नाशिक विभागीय अध्यक्ष अण्णासाहेब सावंत व मराठवाडा विभागीय माजी अध्यक्ष शशिकांत कान्हेरे यांच्या विरोधात जामखेड पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
तसेच तालुक्यातील वेगवेगळ्या ऑफीसमध्ये व व्यापाऱ्यांकडे खोट्या तक्रारी करुन सावंत हा खंडणी मागत असल्याप्रकरणी जामखेडमधील दि जामखेड मर्चंन्टस असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, राहुल सुरेश बेदमुथ्था (वय ४३ वर्षे, रा.संताजीनगर, जामखेड) यांचे जामखेड मार्केट यार्डमध्ये सुरेश ॲन्ड कंपनी नावाचे आडत दुकान आहे. रविवार दि. १० रोजी सकाळी अकरा वाजता या आडत दुकानात राजाराम साधु हुलगुंडे आले व त्यांनी सांगितले की मला उडदाचे सॅम्पल घेऊन अण्णासाहेब सावंत यांनी पाठवले आहे. 

त्यावेळी उडदाचे सॅम्पल पाहुन खराब असल्याने त्यांना हमीभावाप्रमाणे भाव भेटणर नाही तरी मी त्यास २८०० ते ३००० रु. पर्यंत विक्री होऊ शकते असे सांगितले. त्यामुळे सावंत यांनी दुकानात उडीद आणुन टाकला व दुपारी लिलाव होऊन उडीद खराब असल्याने त्याची नोंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी लिलाव रजिस्टरमध्ये घेतली.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

त्यामुळे तो माल व्यापारी बेदमुथ्था यांनी २९५१ रु. प्रमाणे लिलावात घेतला व त्याप्रमाणे संपूर्ण पैसे दिले. त्यानंतर सावंत याने उडीद हमीभावापेक्षा कमी दरात घेतला म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीकडे व जिल्हा उपनिबंधकाकडे तक्रार केली. यामुळे व्यापारी राहुल बेदमुथ्था यांना कृषी उत्पन्न बाजार समितीने नोटीस दिली.

या घटनेनंतर संभाजी ब्रिगेडचे नाशिक विभागीय अध्यक्ष अण्णासाहेब सावंत यांनी व्यापारी राहुल बेदमुथ्था यांना म्हणाले की तुमच्या आडतीचे लायसन्स व आडत सुरळीत चालवायची असेल तर आष्टी येथील संभाजी ब्रिगेडचे माजी मराठवाडा विभागीय अध्यक्ष शशिकांत कान्हेरे यांच्याकडे पाच लाख रुपये देऊन टाका अशी धमकी दिली. 

याबाबतचे मोबाईल रेकॉर्डिंग देखील व्यापारी बेदमुथ्था यांच्याकडे आहे. यानंतर शशिकांत कान्हेरे हे आडत दुकानात आले व तुमच्याकडून सावंत यांनी पैसे घेण्यासाठी पाठवले आहे असे सांगितले. त्यावेळी अण्णासाहेब सावंत यांचा व माझा काही संबंध नाही मी पैसे देणार नाही असे बेदमुथ्था यांनी सांगितले. 

यानंतर बेदमुथ्था यांना दि २ डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता जामखेड येथील जयहिंद चौकात भेटुन अण्णासाहेब सावंत म्हणाले की, तुझ्या विरोधात केलेली तक्रार मागे घ्यायची असेल तर आम्हाला पाच लाख रुपयांची दे असे सांगितले. यामुळे व्यापारी राहुल बेदमुथ्था यांनी जामखेड पोलिस स्टेशनला धाव घेऊन सावंत व कान्हेरे यांच्या विरोधात पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी तक्रार दाखल केली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.