भाजपचे सरकार नौटंकी करण्यात पटाईत.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :भाजपचे सरकार हे नौटंकी करण्यात पटाईत असून, भाजपचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम हे सरकार करत असून, शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर बोटचेपे धोरण भाजप सरकार राबवत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वतीने सरकारविरोधात जनजागृती मोहीम सुरू करणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य अनिल कराळे यांनी दिली.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
शहरातील शासकीय विश्रामगृहावर शिवसेनेच्या वतीने तालुक्‍यातील शिवसैनिकांच्या आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे तालुका उपप्रमुख रफीक शेख, बाबासाहेब ढाकणे, आप्पा सातपुते, अशोक अकोलकर, भाऊसाहेब धस, माणिक लोंढे, एकनाथ झाडे, भगवान दराडे, दत्तात्रेय कोरडे, बापूसाहेब मिरपगार, सुरेश वाघ, भागीनाथ गवळी, उद्धव दुसुंगे, आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने हजर होते.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

कराळे यांनी भाजप सरकारच्या ध्येयधोरणांवर प्रकाशझोत टाकत कडाडून टीका केली. ते म्हणाले, भाजप सरकार हे शेतकरी विरोधी सरकार आहे. नोटबंदी, जीएसटी, कर्जमाफी यासारख्या निर्णयामुळे सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे उत्पादित केलेला माल कवडीमोल भावाने विकावा लागत आहे.सरकार जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. सरकारचे खरे लाभार्थी कोण आहेत हेच कळायला मार्ग नाही. आगामी काळात शिवसेनेची ताकद तालुक्‍यात मोठ्या प्रमाणावर वाढवणार असून गाव तेथे शाखा अशी संकल्पना राबविणार आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.