उडीद खरेदीत व्यापाऱ्याकडून फसवणूक; शेतकऱ्याचा अत्मदहनाचा इशारा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जामखेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील एका व्यापाऱ्याकडून हमी भावापेक्षा कमी भावाने उडीद खरेदी करण्यात आला. यामुळे अण्णासाहेब सावंत या शेतकऱ्याने फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित व्यापाऱ्यावर कारवाई करण्यासाठी दि. १५ डिसेंबर रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
याबाबत जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधकांना दिलेल्या निवेदनात शेतकरी सावंत यांनी म्हटले आहे की, दि. ११ नोव्हेंबर रोजी मी जामखेड बाजार समितीच्या आवारातील व्यापारी सुरेश आणि कंपनी यांच्याकडे उडीद विक्रीसाठी घेऊन गेलो होतो.

त्यावेळी व्यापाऱ्याने पाच हजार प्रतिक्विंटल भाव मिळेल, असे सांगितले. दि.१४ नोव्हें रोजी पैसे आणण्यासाठी मी गेलो असता, लिलावात तुमचा उडीस २९५१ रपये भावाने विकला, असे सांगितले. आपण पाच हजार भाव सांगूनही एवढे पैसे कमी कसे देता,असे मी म्हणताच संबंधित व्यापाऱ्याने मला दमबाजी व शिविगाळ करून पैसे व पट्टी अंगावर फेकून दिली.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

तसेच कोणाकडे जायचे, काय करायचे ते करून घे, असे सुनावले. माझी फसवणूक झाल्याने मी दि. २८ नोव्हेंबर रोजी जिल्हा उपनिबंधकांकडे अर्ज़ करून शासनाच्या हमी भावापेक्षा कमी दराने माल घेऊन माझी अर्थिक फसवणूक केली. यामुळे संबंधित व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करून मला न्याय मिळावा, असे सांगितले. परंतु तेथे मला न्याय मिळाला नाही. यामुळे सावंत दि. १५ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे, असे सावंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.