आजारपणाला कंटाळून नेवासा तालुक्यातील वृद्धेची आत्महत्या.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नेवासा तालुक्यातील ७५ वर्षीय वृद्धेने आजारपणाला कंटाळून पहाटे घराशेजारी १00 फूट अंतरावर अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले, त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे, वैजंताबाई दशरत काेकाटे वय 65, असे वृद्ध महिलेचे नाव असून त्या कोकाटे वस्ती, माका शिवार येथे रहातात, गेल्या ४ - ५ वर्षांपासून त्याना कर्करोगासारख्या व्यधीने ग्रस्त होत्या .

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
वैजयंता कोकाटे यांना तीन विवाहित मुले असून, त्यापैकी एक रायगड जिल्ह्यात शिक्षक म्हणून नोकरीला आहे, माक्यात दुसऱ्या मुलांसोबत त्या राहत होत्या. हा मुलगा शेती करतो. कोकाटे दररोज घरा समोरच्या ओट्यावर झोपायच्या. सकाळी त्या दिसल्या नाही म्हणून सुनेने पाहिले.शोधाशोध केली असता जवळच त्या जळालेल्या अवस्थेत आढळल्या. 

घटनेची माहिती मिळताच सोनई पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण शिंदे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील कार्यवाही सुरू आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Blogger द्वारा समर्थित.