अल्पसंख्याक विकास विभागांतर्गत ७० लक्ष रुपये मंजूर :आ.राजळे

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अल्पसंख्याक समुदायातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागांतर्गत डिसेंबर २०१७ मध्ये ७० लक्ष रुपयांचा निधी अल्पसंख्याक मंत्री विनोद तावडे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे - पालवे, पालकमंत्री राम शिंदे यांच्या सहकार्याने प्राप्त झाला असल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन अल्पसंख्याक बहुल ग्रामीण व शहरी क्षेत्रात मूलभूत - पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत आहे.त्या अंतर्गत शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात अल्पसंख्याक लोकसमूहातील भागामध्ये आतापर्यंत विविध विकास कामे झाली असून, डिसेंबर २०१७ मध्ये ७० लक्ष रुपयांचा निधी अल्पसंख्याक मंत्री विनोद तावडे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंढे-पालवे, पालकमंत्री राम शिंदे यांच्या सहकार्याने प्राप्त झाला असल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली. 

या वेळी त्या म्हणाल्या, पाथर्डी तालुक्यातील अकोले, साकेगाव, मढी येथील जमातखाना बांधकामासाठी प्रत्येकी १० लाख रुपये तर अकोले येथील मुस्लिम वस्तीतील रास्ता काँक्रिटीकरण व अंतर्गत गटार बांधकामासाठी १० लाख रुपये मंजूर झाले आहेत. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

तसेच पाथर्डी नगरपरिषदेत कसबा मशीद येथे जमातखाना बांधकामासाठी १० लाख रुपये तर शेवगाव नगरपरिषदेमधील मदिना चौक ते भगतसिंग चौक पेव्हिंग ब्लॉक बसविण्यासाठी १० लाख रुपये आणि जामा मशीद ते भगतसिंग चौक कब्रस्तानकडे जाणारा रस्ता येथे पेव्हिंग ब्लॉक बसविण्यासाठी १० लक्ष, रुपये याप्रमाणे एकूण ७० लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. आमदार मोनिका राजळे यांच्या प्रयत्नाने अल्पसंख्याक भागासाठी निधी मंजूर झाल्याने नागरिकांनी त्यांचे आभार मानले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.