पिंपळगावपिसा येथील तरुणाचा मृतदेह सापडला.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव गावच्या शिवारात पिंपळगावपिसा येथील रोहिदास तुकाराम पठारे (वय ३२) यांचा मृतदेह दि.12 रोजी सकाळी सव्वासातच्या सुमारास आढळून आला. दरम्यान, रोहिदास तुकाराम पठारे यांनी ऊस टोळीच्या व्यावसायिक कारणातून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
याबाबतची माहिती अशी की, आज दि.12 रोजी सकाळी सव्वासातच्या सुमारास तालुक्यातील पारगावच्या शिवारात रेल्वेगेटजवळ कॅनॉल लगत एका ३० ते ३५ वर्षाच्या व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती पारगावचे कामगार पोलीस पाटील भीमराव नारायण मोटे यांनी श्रीगोंदा पोलिसांना दिली.

श्रीगोंदा पो. ठाण्याचे पोनि. बाजीराव पोवार यांनी त्याठिकाणी ज़ाऊन मृतदेहाची पाहणी केली असता, त्याच्या गळयाभोवती इले्ट्रिरक स्व्हिहस वायर आवळलेली आढळून आली. मयताच्या खिशातील चिट्ठीच्या मजकुरावरून ऊसाच्या टोळीच्या व्यावसायिक वादातून सदर इसमाने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

पोनि. पोवार यांनी तपासाची चक्रे फिरवून संबंधित कारखान्याच्या अधिकाऱ्यांना संपर्क करून पोलीस ठाण्यात बोलावून हा मृतदेह दाखवला असता, सदर मयत इसम पिंपळगावपिसा येथील रोहिदास तुकाराम पठारे असल्याचे सांगितले. 

पारगावचे पोलीस पाटील भीमराव मोटे यांनी दिलेल्या खबरीवरून श्रीगोंदा पो. ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.