अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास पोलीस कोठडी

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अज्ञानपणाचा फायदा घेवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना जून २०१६ ते दि. १ डिसेंबर २०१७ या कालावधीत घडली आहे. याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी राजेंद्र राघोजी गाडे (रा.निमगावजाळी, ता.संगमनेर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, एका सतरा वर्षीय मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेवून तिच्यावर धार्मिक प्रभाव पाडून तिची बदनामी करण्याचा व परीक्षेत तुला कमी गुण पडतील, असा धाक दाखवून तिच्यावर जून २०१६ ते दि.१ डिसेंबर २०१७ या कालावधीत राजेंद्र राघोजी गाडे याने तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

याप्रकरणी अत्याचारीत मुलीने दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी गाडे याच्या विरुद्ध गु.रजि.नं. २६६/२०१७ भादंवि कलम ३७६(२) (एन), पॉस्को ३ व ४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. शहर पोलिसांनी गाडे याला संगमनेर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने शनिवार दि.१६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक गोपाल उंबरकर हे करत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.