कोपरगाव जिल्हा व्हावा; मागणीची पंतप्रधान कार्यालयाकडून दखल.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कोेपरगाव येथील देशभक्ती सेवा मंचच्या वतीने अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून कोपरगाव हा स्वतंत्र जिल्हा करावा, या मागणीचे निवेदन पंतप्रधान कार्यालयास पाठविण्यात आले होते. त्याची दखल संबंधित कार्यालयाने घेतली असल्याची महिती अध्यक्ष रविंद्र नानासाहेब जगताप, सचिव किशोर चोरगे, सहसचिव नानासाहेब मोरे, मार्गदर्शक नगरसेवक मेहमुद सय्यद, प्रसिद्धी प्रमुख किशोर काळे, कार्याध्यक्ष टी. आर. जाधव, सचिव नितीन शिंदे, सहसचिव मौलाना राही शेख, अभियंता संजय इजगे यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे. 


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
या निवेदनाच्या प्रती राष्ट्रपती, मुख्यमंत्री, राज्यपाल व महसूलमंत्री यांना देण्यात आल्या होत्या. कोपरगाव तालुका भौगोलिकदृष्ट्या जिल्ह्याच्या दृष्टीने कसा महत्वाचा आहे, याबाबत १९ मुद्यांचे स्पष्टीकरण आपल्या निवेदनात करण्यात आले आहे, असे रविंद्र जगताप म्हणाले. 

नव्याने करायच्या जिल्ह्यात येवला, मनमाड, वैजापूर, श्रीरामपूर, राहाता, संगमनेर, नेवासा, अकोले, पुणतांबा यांचा समावेश करावा, कारण हे तालुके कोपरगावपासून जवळ आहेत, असेही पत्रकात म्हटले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Blogger द्वारा समर्थित.