‘त्यांच्या’ काळातील रस्ते, सभामंपडप कागदावरच..- आ. बाळासाहेब मुरकुटे

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :येथून मागे फारशी विकासकामे झालीच नाहीत. गेल्या तीन वर्षापासून तालुक्‍यात आमच्या माध्यमातून भरपूर विकासकामे होत आहेत. यापूर्वी तुम्हाला कधी सभामंडप, रस्ते झालेले दिसले का? ते फक्‍त कागदोपत्रीच झाले, हे सर्व सोनईकरांनी गायब केले, अशी टीका आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी माजी आमदार शंकरराव गडाख यांच्यावर नाव न घेता केली.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
नेवासा तालुक्‍यातील गेवराई येथील महादेव मंदिरासमोरील पाच लाख रूपये खर्चाच्या सभामंडप बांधणीचा शुभारंभ आ. मुरकुटे यांच्या हस्ते पार पडला. अध्यक्षस्थानी गोरक्षनाथ महाराज पाटेकर होते. यावेळी व्यसपीठावर भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अंकुश काळे, सोपान कर्डिले, सरपंच पांडुरंग सतरकर, सतरकर गुरुजी, प्रकाश धनवटे, दिलीप चरभरे, शंकर खाटीक आदी मान्यवर उपस्थित होते.

आ. मुरकुटे म्हणाले की, प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल मंजूर होतात. परंतु, तालुक्‍यात सभापती सुनीता गडाख सांगतात की, आम्ही घरकुले मंजूर केली. तुम्हाला जर लोकांना घरे द्यायची तर तुमच्या संस्था, कारखान्यांमधून संयुक्‍त घरकुले द्या. पाणी वापर संस्था या आपल्या मुळावर असून पाणी वापर संस्थांच्या अध्यक्षांनी सामूहिक राजीनामे द्यावे. यापुढे टेलपर्यंत पाणी मिळणार असून त्याची पूर्ण जबाबदार माजी असल्याचे आ. मुरकुटे यांनी सांगितले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
ज्ञानेश्‍वर सहकारी साखर कारखान्याने 2 हजार 500 पहिली उचल दिली. मुळा कारखाना आधी 2 हजार 100 रूपयांवरून आता 2 हजार 300 रूपये भाव देण्यास तयार झाला. त्यांना 2 हजार 500 रूपये पहिली उचल द्यावीच लागेल. सातारा, सांगली, कोल्हापूर भागातील कारखाने 3 हजार 300 रूपये दर देतात. 

आपले कारखाने 2 हजार 300 रूपये दर देतात ही तफावत आता आपण सहन करणार नाही. मागील तीन-चार वर्षापूर्वी 11 टक्‍के रिकव्हरी असणारे कारखाने आज 8 ते 9 टक्‍क्‍यावर कसे आले? हा शेतकऱ्यावर अन्याय असून मी स्वतः याबाबत आवाज उठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.