कर्जमाफीची रक्कम खात्‍यात जमा झाल्‍याने शेतकऱ्यांत समाधान.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कर्जमाफीची प्रत्यक्ष रक्कम खात्यात जमा झाली याचे समाधान अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत अहमदनगर जिल्‍हयातील 2 लाख 40 हजार 739 शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मंजूर झाला आहे. शेतक-यांच्‍या खात्‍यावर कर्जमाफी तसेच प्रोत्‍साहनपर अनुदानाची रक्‍कम गतीने जमा होऊ लागल्‍याने शेतक-यांनी समाधान व्‍यक्‍त केले आहे. 


काशिनाथ मारुती नवले 
माझ्यावर गावातील विविध कार्यकारी सोसायटीचे 34 हजार 532 रुपये कर्ज होते. सरकारच्‍या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत सर्व कर्जमाफ करण्‍यात आले. त्‍यामुळे माझा सातबारा कोरा झाला आहे. त्‍याबद्दल मी मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो अशी प्रतिक्रिया पारनेर तालुक्‍यातील नारायणगव्‍हाण येथील शेतकरी काशिनाथ मारुती नवले यांनी व्‍यक्‍त केली.

बबन मारुती आतकर 
करंदी तालुका पारनेर येथील बबन मारुती आतकर म्‍हणाले की, मी थकीत कर्जदार होतो. मला 47 हजार 662 रुपयांची कर्जमाफी मिळाली. सरकारच्‍या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत कर्जमाफी मिळाल्‍याचा आनंद झाला आहे.

रुईछत्रपती तालुका पारनेर येथील विठ्ठलराव आबासाहेब दिवटे म्‍हणाले ,माझ्यावर राष्‍ट्रीयकृत बॅंकेचे 51 हजार 604 रुपये कर्ज होते. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत माझे कर्जमाफ झाले. माझ्या खात्‍यावर कर्जमाफीची रक्‍कम जमा झाली. माझ्या कुटुंबाला यामुळे दिलासा मिळाला आहे.


माझ्यावर 1 लाख 13 हजार 618 रुपये कर्ज होते. माझे कर्जमाफ झाले आणि माझ्या खात्‍यावर पैसे जमा झाले अशी प्रतिक्रिया पारनेर तालुक्‍यातील रायतळे गावातील शेतकरी भाऊसाहेब यशवंत चितळकर यांनी दिली आहे. कर्जमाफीची खात्‍यावर जमा झालेली रक्‍कम पाहून शेतकरी समाधान व्‍यक्‍त करत होते.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.