अहमदनगर जिल्‍हयात 2 लाख 40 हजार 739 शेतक-यांना कर्जमाफी मंजूर

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्‍मान योजना अर्थात राज्‍यातील ऐतिहासिक कर्ममाफी अंतर्गत अहमदनगर जिल्‍हयातील 2 लाख 40 हजार 739 शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मंजूर असून 1 लाख 2 हजार 248 शेतकरी कर्जमाफी अंतर्गत तर 35 हजार 81 शेतक-यांना वनटाईम सेटलमेंट लाभ मिळणार आहे. तसेच 1 लाख 3 हजार 410 शेतक-यांना प्रोत्‍साहनपर अनुदानाचा लाभ मंजूर करण्‍यात आला आहे.


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत राज्यात साधारण 41 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शासनाने 19 हजार कोटी रुपयांची रक्कम बँकांकडे वर्ग केली आहे. या योजनेंतर्गत राज्‍यभरात 77 लाख अर्ज प्राप्त झाले होते. छाननीअंतर्गत डुप्लिकेशन झालेले खाते दूर करुन 69 लाख खात्यांवर कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली.

 त्यापैकी जवळपास 41 लाख खात्यांमध्ये कर्जमाफीचे अनुदान देण्यासाठी राज्य शासनाकडून बँकांकडे सुमारे 19 हजार कोटी रुपये इतका निधी हस्तांतरित करण्यात आला. जे शेतकरी पात्र होते पण अर्ज केला नाही अशा शेतकऱ्यांनाही या योजनेत सामावून घेणार येणार आहे. शेवटच्या पात्र शेतकऱ्याला मदत मिळेपर्यंत ही योजना सुरु ठेवली जाईल.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
शेतक-यांसाठी कर्जमाफीची ही योजना कृषी व्‍यवस्‍थेला बळ देणारी ठरली आहे. या योजने अंतर्गत शेतकरी कुटूंबाचे दीड लाख रुपयांपर्यतचे कर्ज माफ करणे , नियमित परतफेड करणा-या शेतक-यांना 25 हजार रुपयांपर्यत प्रोत्‍साहनपर अनुदान देण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला. योजनेच्‍या गतीमान व पारदर्शक कार्यवाहीसाठी ऑनलाईन प्रक्रिया राबविण्‍यात आली.

 ग्रामीण अर्थव्‍यवस्‍थेत महत्‍वाची भूमिका बजावणारी जिल्‍हा सहकारी बँक व विविध राष्‍ट्रीयकृत बँकांवर कर्जमाफीची रक्‍कम वितरणाची जबाबदारी सोपविण्‍यात आली. त्‍यासाठी नियुक्‍त कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्‍यात आले. ऑनलाईन प्रक्रियेसाठी अद्यायवत यंत्रणाही उपलब्‍ध करुन देण्‍यात आली. त्‍यामुळे देशातील आजवरची सर्वात मोठी शेतकरी कर्जमाफी गतीने होण्‍यास मदत होत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.