नगरसेवक समदखान यांच्या समर्थनार्थ पोलीस अधीक्षक कार्यालयावर नागरिकांचा मोर्चा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :मुकुंदनगर येथील नगरसेवक समद खान यांचा अंडा गँगशी संबंध नाही. पोलीस प्रशासनाला खोटी माहिती देऊन दिशाभूल सुरू आहे. निवेदन देणारी घरातीलच भेदी आहेत. या दिशाभूल करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मुकुंदनगरमधील नागरिकांनी केली. यासाठी मुकुंदनगरमधील सुमारे हजार लोकांना मोर्चा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर गेला होता. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. समद खान यांच्यावर पोलिसांनी चुकीची कारवाई केल्यास त्याचे उत्तर घेऊ. वेळप्रसंगी रास्ता रोको आंदोलन करू, असा इशारा यावेळी नागरिकांनी दिला. . समद खान यांची राजकीय प्रवास या निवेदनात मांडला आहे. विद्यमान नगरसेवक आहेत. सलग तीन वेळा ते परिसरातून निवडणूक आले आहेत. 

प्रभागात मुस्लिमांप्रमाणे इतर धर्मिय देखील राहतात. हिंदू-मुस्लिम असा कधीही तणाव येथे झाला नाही. फौजदारी गुन्ह्यात ते दोन वर्षापासून कारागृहात आहेत. सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना काही तथाकथित लोकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन समद खान यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे. खान व त्यांच्या साथीदारांची या परिसरात दहशत असून, अंडा गँगचा म्होरक्या समद खान असल्याचा आरोप करीत आहेत. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
राजकीय उद्देशातून सुड घेण्याचा हा प्रयत्न आहे. खान यांना राजकीय जीवनातून उद्धवस्त करण्यासाठी काही राजकीय मंडळीच्या इशाऱ्यावर त्यांच्यावर आरोप होत असून अपप्रचार चालू असल्याचे देखील निवेदनात म्हटले आहे. . अंडा गँग व समद खान यांचा कुठल्याही प्रकारे संबंध नाही. उलट पोलीस प्रशासनाने अंडा गँगसारख्या टोळीवर सखोल माहिती घेऊन कारवाई करावी. 

खोट्या माहितीच्या आधारे समद खान यांच्यावर कारवाई करु नये. खोट्या माहितीचे निवेदन देवून, पोलिस प्रशासनाची दिशाभूल करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली. सदर व्यक्तींवर कारवाई न झाल्यास औरंगाबाद महामार्गावर 'रास्ता रोको' आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.