राहुरी रेल्वे स्टेशन येथे लवकरच भुयारी मार्ग

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या राहुरी रेल्वे स्टेशन येथील भुयारी मार्गाच्या कामाची इ-निविदा मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने प्रसिद्ध केल्याने राहुरी स्टेशन येथील भुयारी मार्गाचा प्रश्न आता मार्गी लागणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
दौंड-मनमाड रेल्वे मार्गावरील वांबोरी स्टेशन ते बेलापूर (श्रीरामपूर) मधील सहा रेल्वेगेट कायमस्वरूपी बंद करण्यात येणार असून त्यामध्ये प्रामुख्याने राहुरी रेल्वे स्टेशन येथील गेटचाही समावेश असून याठिकाणी भुयारी मार्ग होणार आहे. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून याबाबत इ-निविदा प्रसिद्ध झाल्याने राहुरी रेल्वे स्टेशनला आता भुयारी मार्गाची असणारी प्रतिक्षा लवकरच संपणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून इ-निविदा प्रसिद्ध झाली असून त्यात वांबोरी स्टेशन ते बेलापूर दरम्यान सहा रेल्वेगेट बंद करण्यासाठी व भुयारी मार्ग करण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. यामध्ये राहुरी रेल्वे स्टेशन (गेट नं-४०), टाकळीमियॉ - राहुरी रेल्वे स्टेशन (गेट नं-४१), मुसळवाडी - टाकळीमिया रोड (गेट नं-४२), गेट नं-४३, पढेगाव ते बेलापूर (गेट नं-४७) व गेट नं. ४८ यांचा समावेश आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
निविदेमध्ये या कामांवर १० कोटी १४ लाख ३० हजार ३३७ रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. राहुरी रेल्वे स्टेशन येथे निविदेमध्ये नमूद केल्याप्रमाणे सहा मीटर बाय सहा मीटर असा भुयारी मार्ग (कट व कव्हर मेथड द्वारे) या पद्धतीने बांधण्याबाबत सूचित केले आहे. तसेच रेल्वे गेट कायमस्वरूपी बंद करण्यापूर्वी भुयारी मार्गाची तरतूद करण्याची अट घालण्यात आली आहे. या इ-निविदा ११ जानेवारी २०१८ पर्यंत मागवण्यात आल्या आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.