नितीन आगे खून प्रकरणातील १३ फितूर साक्षीदारांना नोटीसा

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  जामखेड तालुक्यातील खर्डा येथील नितीन आगे खून प्रकरणातील १३ फितूर साक्षीदारांविरुद्ध सरकारपक्षातर्फे दाखल करण्यात आलेल्या प्रकरणात जिल्हा न्यायालयाने नोटीसा काढण्याचा हुकूम केला. या प्रकरणाची सुनावणी दि. २० डिसेंबर २०१७ रोजी ठेवण्यात आली आहे. अशी माहिती अतिरिक्त सरकारी वकील ॲड. रामदास गवळी यांनी दिली.


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
जिल्ह्यात गाजलेल्या जामखेड तालुक्यातील खर्डा येथील नितीन आगे याची प्रेमप्रकरणातून हत्या झाली होती. या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डब्ल्यू हुड यांच्यासमोर होऊन न्यायालयाने या खटल्यातील नऊ आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.दरम्यान या खटल्यातील १३ फितूर साक्षीदारांविरुद्ध सरकार पक्षातर्फे कारवाई करण्याबाबत जिल्हा न्यायालयात अपिल दाखल केले होते.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

या अपिलावर न्यायालयाने फितूर साक्षीदार सदाशिव आश्रुबा होडशिळ (रा. गितेवाडी, जामखेड) विकास कचरू डाडर, रमेश भगवान काळे, रावसाहेब उर्फ बबलू अण्णा सुरवसे, लखन अशोक नन्नवरे, विष्णू गोरख जोरे, बबलू ज्ञानेश्वर जोरे (सर्व रा. खर्डा, ता. जामखेड) सदाशिव मुरलीधर डाडर (रा. चुंभळे, ता. जामखेड), साधना मारूतीराव फडतरे (रा. जामखेड, ता. जामखेड), राजेंद्र बाजीराव गिते (रा.जामखेड,), अशोक विठ्ठल नन्नवरे (रा. खर्डा, ता. जामखेड), हनुमंत परमेश्वर मिसाळ .(रा. खर्डा, ता. जामखेड) आणि राजू सुदाम जाधव (रा. करंजवन, ता. पाटोदा, जि. बीड) यांना नोटीसा काढण्याचा हुकूम केला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.