तोतया वाहतूक पोलिसाने १३ लाख रूपयांना गंडविले.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सीआयडी, पोलीस असल्याचे भासवून अनेकांना लुटण्यात आलेल्या घटना आपण सातत्याने पाहतो, वाचतो. मात्र, नेवाशात वाहतूक पोलिसाची वेशभूषा करून १३ लाख रूपयांना गंडा घातल्याची घटना काल (दि. १०) रात्री सहा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी : युनूस युगन शेख (वय ३४, रा. वळण, ता. राहुरी) हे आपल्या मित्रासोबत कारने (क्र. एमएच १७ बीव्ही १३५२) नेवाशाला कामानिमित्त आले होते. ते मुकिंदपूर शिवार (नेवासा फाटा) येथील अकोलकर बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स या दुकानासमोरून चालले होते.

यावेळी वाहतूक पोलिसाच्या वेश परिधान करून एका अज्ञात व्यक्तीने मोटारसायकल (क्र. एमएच १९ एएस १५५३) वरून त्यांचा पाठलाग केला. त्यांना गाडी थांबविण्यात सांगितले. त्यानंतर त्यांच्याकडे लायसन्स व गाडीचे कागदपत्राची विचारणा केला. गाडी पोलीस ठाण्यात घेऊन जावे लागेल असे सांगत गाडीत जावून बसला. गाडीत ठेवलेले चार लाख रूपयांची रोकड, गाडीचे कागदपत्र व दोन चेकबुकसह सुमारे १३ लाख रूपये घेऊन पोबारा केला. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

आपण गंडविले गेल्याचा लक्षात येताच शेख व त्यांच्या मित्राने या व्यक्तीचा शोध घेतला. मात्र, तो मिळून आला नाही. त्यामुळे आज (दि. ११) युनूस शेख यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार नेवासा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरूद्ध गु.र.नं. ५०४/१७ भादंवि कलम कलम १७१, ४१९, ४२० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रविण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पी. आर. भिंगारे हे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------


Powered by Blogger.