शेतकरी आत्महत्यांना केंद्रातील मोदी सरकार जबाबदार : अण्णा हजारे.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-केंद्र सरकार राज्यांनी दिलेल्या कृषिमूल्यामध्ये कपात करून शेतकऱ्यांवर अन्याय करीत आहे. नैसर्गिक आपत्तीत पीक विम्याचे पैसे भरूनही शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळत नाहीत. अशा दुहेरी संकटात सापडलेले शेतकरी आत्महत्याचे पाऊल उचलत आहेत, शेतकरी आत्महत्यांना केंद्रातील मोदी सरकार जबाबदार असल्याची परखड टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
याबाबत शेतकरी व लोकपाल प्रश्नावर अण्णा हजारे यांनी दि. २३ मार्चपासून दिल्लीत आंदोलन करणार असल्याचे पंतप्रधान मोदींना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. हजारे यांनी शहीद दिवस दि. २३ मार्चपासून लोकपाल, लोक आयुक्त व शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी दिल्लीत आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या प्रशांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. 

राज्यातील कृषिमूल्य आयोगाने शेतकऱ्यांच्या शेतमालाला निर्धारित हमीभाव निश्चित केला आहे. कृषी विद्यापीठातील तज़्ज्ञांनी अभ्यास करून शेतीमालाचे हमीभाव ठरवलेले असतात. मात्र, या हमीभावामध्ये केंद्र सरकारकडून कपात करून शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

नैसर्गिक आपत्तीत विमा मिळावा म्हणून शेतकरी पीक विम्याचा हप्ता भरीत असतो. परंतु शेतकऱ्यांनी बँकेकडून पीककर्ज घेतल्यावर बँक शेतकऱ्यांच्या कर्जाच्या रकमेतून पाच टक्के विम्याचे पैसे कपात करतात, त्यामुळे शेतकरी आणखी संकटात सापडत आहे. शेतातील पिकांवर झालेला खर्च व विम्याची रक्कमही मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त होतो. 

शेतकऱ्यांना या संकटातून वाचवण्यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळण्याचा कायदा करावा व शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावावेत, यासाठी आपण दिल्लीत दि.२३ मार्च रोजी आंदोलन करीत असल्याचे हज़ारे यांनी पत्रात म्हटले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.