सिग्नल तोडणाऱ्या बहाद्दरांमुळे पोलीस हवालदिल

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी भर चौकामध्ये उन्हात उभा राहून ट्रॅफिक हवालदार व्हिसल वाजवित हातवारे करुन दिशा, निर्देश देतात. मात्र, उंडग्या डोक्‍याचे हवसे, नवसे बिनदिक्कीतपणे दुचाकी आणि चार चाकीही सिग्नल तोडून पुढे दामटतात अशांना आवरत मग ड्युटीवरचा हवालदार “अरे मरशील ना, फार घाई झाली का ? अशी पोटतिडकीने सादही घालतो. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
मात्र, त्याची कळकळीची साद येईपर्यंत बेशिस्त वाहन चालक कारवाईच्या भीतीने पोबारा करतो. सिग्नल तोडणाऱ्या बहाद्दरांमुळे पोलीस हवालदिल झाले आहे. वाहतुकीचे नियम स्वयंस्पूर्तीने अंगीकारल्यास अपघाताच्या दुर्देवी घटना निश्‍चितच टळतील. यासाठी शहर वाहतूक विभागाच्या प्रयत्नास नागरिकांच्या सहकार्याची जोड अपेक्षीत आहे.

वास्तविक पाहता वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणारे हे बहाद्दर स्वत:बरोबर इतरांचाही जीव धोक्‍यात घालतात आणि अशा प्रसंगी ट्रॅफिकवाले कुठे होते. असा मानभावी प्रश्‍न हमखास उपस्थित केला जातो. खांद्याला मोबाइल, वाकडी मान करुन तसेच कानात हेड फोन लावून सिग्नल तोडून घाईने वाहन दामटणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे.

वाढत्या वाहन संख्येमुळे हमरस्त्यावर गर्दी वाढत चालली आहे. वाहतुकीचे नियमन व्यवस्थित होण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी पोलीस विभाग व उपप्रादेशिक विभागाची यंत्रणा कार्यरत आहे. वर्दळीच्या चौकात ट्रॅफिक हवालदरासहित सिग्नलची यंत्रणा आहे. मात्र, सिग्नल तोडून बेफामपणे निघू पाहणाऱ्या वाहन चालकांची मानसिकता आणि वृत्ती बदलत नसल्याचे वारंवार आढळते.

वाहतुकीचा नियम तोडल्यानंतर वाहतूक शाखेकडून नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जाते. नियम तोडलेले वाहन पकडले की सोडा, असे सांगणारे फोन कर्मचाऱ्यांना येतात. थोडक्‍यात वेड्यांनी नियम तोडायचे आणि शहाण्यांनी सोडा म्हणून सांगायचे, असा प्रकार अनेकवार घडतो.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
शहरात प्रेमदान चौक, पत्रकार चौक, कोठी रस्ता, मार्केट कमिटी, इम्पिरियल चौक, स्वस्तिक चौक, सक्कर चौक व कायनेटिक चौक, हे हमरस्त्यावरील वर्दळीचे ठिकाणे आहे. या ठिकाणावरील वाहनांची संख्या लक्षात घेऊन वाहतूक नियमनासाठी पोलीस यांच्या वाहतूक शाखेचे कर्मचारी भर उन्हात, थंडी वाऱ्यात आपले कर्तव्य बजावत असतात. चौकाच्या ठिकाणी सिग्नलच्या यंत्रणेसहीत वाहतूक शाखेचा हवालदारही दिशा, निर्देश देत असतो.

वाहन आपले असले तरी रस्ता सार्वजनिक आहे. आणि या सार्वजनिक रस्त्यावरही वाहतुकीचे नियम पाळायला हवे, याचे भान देण्यासाठीच अशोक शिरसाठ, पी. एल. गंगावणे सारखे जिल्हाभरातील ट्रॅफिक हवालदार हमरस्त्यावर चौकाचौकात उभे आहेत. पण हे लक्षात कोण घेतो. रविवारी असाच एक अपघात एसपी कार्यालयाच्या चौकात ट्रॅफिक हवालदाच्या व अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे टळला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.