अमरापूरकर पुरस्काराने सुरेल आवाजाच्या सुरेश वाडकरांचा केलेला सन्मान योग्य - जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  स्व. सदाशिव अमरापूरकरांनी केलेल्या विविधांगी भूमिका पाहून मला थक्क व्हायला होत. त्यांच्या नावाने थिंक ग्लोबल फौंडेशनच्या वतीने दिला जाणारा दुसरा पुरस्कार सुरेश वाडकरां सारख्या सुरेल आवाजाच्या आणि अमरापूरकरांच्या विविधांगी भूमिकांप्रमाणे विविध बाजाची गाणी लीलया गाणाऱ्या व्यक्तीला दिला जात आहे याचा मला मनस्वी आनंद आहे, असे प्रतिपादन जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी केले.

--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
फौंडेशनच्या वतीने माऊली सभागृह येथे आयोजित अमरापूरकर पुरस्कार सोहळ्याच्या वेळी गोखले बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सुनंदा अमरापूरकर, राजाभाऊ अमरापूरकर, गायक पं. शौनक अभिषेकी, फौंडेशनचे अध्यक्ष किरण काळे, डॉ. दीपक, उमेश पाटील, दीपक शर्मा, अनिल जोशी आदी उपस्थित होते.

गोखले म्हणाले की, वाडकरांची सुमधुर गाणी ऐकताना मी कित्तेक रात्री घालविलेल्या आहेत. वाडकर आपल्या संगीत अकादमीच्या माध्यमातून सुरेल भावी पिढी घडविण्याचे महान कार्य करीत आहेत. त्यांच्या या कार्याला सतत बळ मिळो.

नगरकरांविषयीच्या आठवणी सांगताना गोखले म्हणाले की, आम्हा नाटकवाल्यांवर नगरकरांनी नेहमीच भरभरून प्रेम दिल. आम्हाला कधी विन्मुख होवून पाठवलं नाही. मी नगरला अनेक प्रयोग केले. नगरच्या मातीने फिल्म इंडस्ट्रीला मधुकर तोरडमल आणि सदाशिव अमरापूरकर असे दोन हिरे दिले याचा मला अभिमान आहे.
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
यावेळी पुरस्काराला उत्तर देताना वाडकर म्हणाले की, कलाकाराच्या आयुष्यात पुरस्कार फार महत्वाचे असतात. फौंडेशनने मला या पुरस्कारासाठी योग्य समजले हे मी माझे भाग्य समजतो. अमरापूरकरांसाठी मला कधी पार्श्वगायन करायची संधी मिळाली नाही, अशी खंत यावेळी बोलताना वाडकर यांनी व्यक्त केली.

राजाभाऊ अमरापूरकर यांनी यावेळी स्व. सदाशिव अमरापुरकारांच्या आठवणींना उजाळा दिला. किरण काळे आणि थिंक ग्लोबल फौंडेशनमुळे सदाशिवच्या स्मृती नगर शहरात जपल्या जात आहेत याबद्दल अमरापूरकर कुटुंबियांना आनंद असल्याचे यावेळी ते म्हणाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष किरण काळे यांनी केले. सूत्रसंचलन वीणा दिघे यांनी तर मानपत्राचे वाचन प्रा. उद्धव उगले यांनी केले.

सोहळ्यास अभूतपूर्व गर्दी
सोहळ्याची नगरकरांमध्ये मोठी उत्सुकता होती. कार्यक्रमाची वेळ साडे सहाची असताना सहा वाजताच सभागृह खचाखच भरलेले होते. तर त्याही पेक्षा जास्त रसिकांनी सभागृहा बाहेर गर्दी केली होती. सर्वांना सोहळ्याचा आनंद लुटता यावा यासाठी आयोजकांना सभागृहा बाहेर स्क्रीनची व्यवस्था करावी लागली.

सोहळ्यानिमित्त आयोजित मैफिलीला ननगरकरांची भरभरून दाद
सुप्रसिद्ध गायक पं. शौनक अभिषेकी यांच्या भक्ती-नाट्य संगीत मैफिलीचे या निमित्ताने आयोजन करण्यात आले होते. अंजली व नंदिनी गायकवाड यांच्या गायनाने सुरु झालेला सोहळा अभिषेकी यांच्या भारावून टाकणाऱ्या मैफिलीने रात्री बारा वाजता संपला. तब्बल पाच तास चालेल्या या सोहळ्यास आणि मैफिलीस नगरकरांनी भरभरून दाद दिली.

अंजली – नंदिनी गायकवाड भगिनींचे वाडकरांनी केले कौतुक
सुरेश वाडकर व विक्रम गोखले यांच्या हस्ते फौंडेशनच्यावतीने अंजली-नंदिनी या भगिनींचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी कौतुक करताना वाडकर म्हणाले की, जर परमेश्वराने या दोन बहिणींन समवेत द्वंद्व गीत गाण्याची संधी मला दिली तर मी स्वतःला भाग्यवान समजेल. या दोघी म्हणजे आमच्या फिल्म इंडस्ट्रीच्या भावी लोकप्रिय होणाऱ्या पार्श्वगायिका आहेत.त्यांना घडवणारे त्यांचे वडील अंगद गायकवाड यांना मी सॅल्युट करतो.

विक्रम गोखलेंनी प्रमोद कांबळेची केली वाहवा !
नगरच्या आठवणींबद्दल सांगताना गोखले म्हणाले कि, मी जिल्हा बँके समोरील महानगरपालिकेच्या एका हॉलला भेट दिली. कोणी तरी तिथे भिंतीवर चित्र काढली आहेत. अत्यंत अप्रतिम अशी ती चित्र आहेत. मी एकदा नाही तर ज्या-ज्या वेळी नगरला आलो त्या त्या वेळी पुन्हा पुन्हा ती चित्र पाहिली आहेत. कोणी काढली हे मला माहित नाही. यावेळी ती प्रमोद कांबळे यांनी काढली आहेत आणि ते आपल्यामध्ये उपस्थित आहे असे किरण काळे यांनी गोखलेंना सांगितले. गोखलेंनी यावेळी कांबळे यांच्यातील कलाकाराला सलाम केला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.