युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजीत तांबे इस्त्राईलच्या अभ्यास दौ-यावर.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  इस्त्राईल सरकारच्या निमंत्रणावरुन भारतीय युवा नेत्यांचे शिष्टमंडळ हे अनेक विषयांच्या अभ्यासासाठी इस्त्राईल दौर्यावर जाणार आहे. या शिष्टमंडळात काँग्रेस पक्षाच्यावतीने युवा नेते तसेच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांचा समावेश आहे.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
सत्यजीत तांबे यांनी गेली अनेक वर्षे सातत्याने ग्रामपातळीपासून ज राज्यपातळीपर्यंत युवकांची बांधणी केली आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून साकूर गटात ग्रामीण विकासाचे मॉडेल ठरणारे काम उभे केले. देश पातळीवरून नेहरु युवा केंद्राच्या माध्यमातून युवकांसाठी क्रिडा, सांस्कृतीक क्षेत्रातील उल्लेखनिय कार्य, याचबरोबर समाजाच्या सर्वस्तरावरील कार्यकर्त्यांचा सातत्याने संपर्क, विविध विषयांचा सखोल अभ्यास, युवकांसाठी रोजगार मेळावे, व्यक्तीमत्व विकास शिबिरे, नेतृत्व विकास शिबिरे, ,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञांच्या व्याख्यानांचे ते आयोजन करत आहेत. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
तांबे यांचे इंग्रजी, हिंदी यांसह विविध भाषांवर असणारे प्रभुत्व यामुळे त्यांना देशपातळीवर विविध संस्थांमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. यापूर्वी अमेरीका, युरोपचा अभ्यास दौरा केला आहे. इस्त्राईल सरकारच्या निमंत्रणावरुन सत्यजीत तांबे इस्त्राईलला रवाना झाले आहेत. या दौर्यात ते दूध, शेती, जलसिंचन, आधुनिक तंत्रज्ञान या विषयांचा अभ्यास करणार आहेत.तांबे यांच्या या दौर्यामुळे युवकांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.