महाराष्ट्रातही पुढील सरकार हे काँग्रेसचेच असणार - आ.बाळासाहेब थोरात

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सध्या कापसाला बोंडआळीचा वाढता प्रार्दुभाव, ऊस प्रश्­नांबाबत सरकारचे गोंधळाचे धोरण यांसह राज्यात पहिल्या टप्प्यातील १३१४ शाळा बंद करण्याचा निर्णय हा घटनेविरोधी, दुर्देवी व अत्यंत बेकायदेशीर असल्याची टीका माजी महसूल व शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
संगमनेर येथील एका कार्यक्रमात सरकारच्या विविध धोरणांबाबत बोलतांना ते म्हणाले, सरकार फक्त फसव्या जाहिराती व घोषणाबाजी करत आहेत. कायद्याने प्रत्येक बालकास शिक्षणाचा मुलभूत अधिकार दिला आहे. १४ वर्षापर्यंतचे शिक्षण मोफत व सक्तीचे केले आहे. मात्र, पटसंख्येचे कारण दाखवून शासनाने अनेक शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मुळात या शाळा डोंगराळ व दुर्गम भागात आहेत. तेथे पटसंख्या कमीच असणार आहे. एक कि.मी.च्या आत लहान मुलांना शाळा असणे गरजेचे आहे. शाळा बंद केल्यामुळे सहा वर्षांचे लहान मुले तीन किमी कसे जाणार आहे. प्रत्येक बालकास शिक्षण मिळाले पाहिजे, ते शाळेत आले पाहिजे व टिकले पाहिजे याची सर्व जबाबदारी सरकारची आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
फक्त जाहिराती आणि घोषणा !
कर्जमाफीची घोषणा झाली पण यावर शेतकऱ्यांचा विश्­वास नाही. कर्जमाफीबाबत अजूनही संभ्रम आहे. एकूणच सरकारचे कोणत्याही क्षेत्रात अभ्यासपूर्ण नियोजन नाही. कोणतेही ठोस काम नाही. मागील तीन वर्षांच्या काळात एकही नवीन विकास काम दिसत नाही. फक्त जाहिराती आणि घोषणा आहे. त्यामुळे भाजप सरकारच्या अच्छे दिनचे स्वप्न हवेत विरले. 

महाराष्ट्रातही पुढील सरकार हे काँग्रेसचेच 
काँग्रेसने श्रीमती सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने व देशाच्या जनतेच्या विकासाचे कामे केली. खा.राहुल गांधी यांनी पुन्हा पक्षात नवचैतन्य निर्माण केले असून गुजरातमध्येही काँग्रेस सरकारच सत्तेवर येणार असून महाराष्ट्रातही पुढील सरकार हे काँग्रेसचेच असणार आहे, असा ठाम  विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.


-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.