विहिरीत पडलेला बिबट्या मोठ्या शर्थीनंतर बाहेर.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  श्रीरामपूर  तालुक्‍यातील खंडाळा येथे शुक्रवारी मध्यरात्री विहिरीत पडलेल्या बिबट्याला मोठ्या शर्थीनंतर क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले. हा दोन वर्षे वयाचा नर जातीचा बिबट्या असून तो सुरक्षित असल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
शनिवारी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान बिबट्या विहिरीच्या बाहेर काढला गेला. अरूण मुरलीधर ढोकचौळे यांच्या विहिरीत शुक्रवारी रात्री तो पडला होता. पोहून थकल्यानंतर विहिरीच्या एका कोपऱ्यात तो जाऊन बसला होता. सकाळी वीजपंप सुरू करण्यासाठी गेलेल्या ढोकचौळे यांच्या हा प्रकार लक्षात आला. थोड्याच वेळात बघ्यांची गर्दी झाली.

वनरक्षक बी. बी. झिंजुर्डे, वनपाल गावडे व कर्मचारी गोरक्षनाथ सुरासे घटनास्थळी दाखल झाले. विहिरीत असलेल्या पाण्यामुळे कर्मचाऱ्यांना बिबट्याला बाहेर काढणे कठीण बनले. त्यातच बघ्यांच्या गर्दीने अडथळा येत होता. अखेर तासाभराच्या प्रयत्नानंतर क्रेनच्या मदतीने बिबट्या बाहेर काढला गेला. त्याला पिंजऱ्यात टाकून गावाबाहेर सुरक्षित स्थळी नेण्यात आले. सहाय्यक वनरक्षक रमेश देवखिळे व वनपरिक्षक एस. एम. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
खंडाळा परिसरात महिनाभराच्या अंतरात पकडलेला हा तिसरा बिबट्या आहे. अजूनही चार ते पाच बिबटे असल्याचे परिसरातील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. श्रीरामपूर तालुक्‍यासाठी वनविभागाकडे सध्या केवळ आठच पिंजरे आहेत. त्यातच दाढ, अश्‍वी, खंडाळा, उक्कलगाव, भेर्डापूर, पाथरे या प्रवरा नदीच्या काठावर अनेक बिबट्यांचा वावर आहे. त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परिणामी अजून पाच पिंजऱ्यांची आवश्‍यकता आहे. वनकर्मचाऱ्यांची संख्यादेखील तोकडी पडत आहे.


-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.