संगमनेर तालुक्यातील विवाहित महिला चार दिवसांपासून बेपत्ता

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथून रंजना बाळासाहेब थोरात (वय ४० ) नामक विवाहित महिला चार दिवसांपासून बेपत्ता झाली आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात मिसिंग रजिष्टर नोंद करण्यात आली आहे. 


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
वडगावपान येथे राहणारी रंजना थोरात ही बुधवारी (दि. ६) सकाळी बिरोबाच्या दर्शनासाठी जाते असे सांगून घरातून बाहेर पडली. त्यानंतर ती पुन्हा घरी परतली नाही. नातेवाईकांनी तिचा शोध घेवूनही न सापडल्याने पती बाळासाहेब बबन थोरात यांनी अखेर पोलिसांत खबर दिली. रंगाने गोरी, शरीराने मध्यम, चेहरा उभा, कपाळावर गोंदलेले, अंगात पोपटी ब्लाउज व त्याच रंगाची साडी असे तिचे वर्णन आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
रंजना थोरात ही आठ महिन्याची गरोदर असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात मिसिंग रजिस्टर क्र. ५० / २०१७ नुसार नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बाबा खेडकर अधिक तपास करीत आहे. वरील वर्णनाची विवाहित महिला कुणाला आढळल्यास संगमनेर तालुका पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन खेडकर यांनी केले आहे.


-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.