कर्जबाजारी शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  नगर तालुक्यातील रुईछत्तीशी येथील शेतकरी बाळासाहेब गणपत गोरे वय ५१ यांनी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.सततचा दुष्काळ, खर्च करूनही आलेले पीक आणि संपणारा कौटुंबिक खर्च यामुळे ते त्रस्त होते. मोलमजुरी करून त्यांचा चरितार्थ सुरू होता. त्यांच्यावर सेवा सोसायटी इतर बँकांचे कर्ज होते, पण ते भरता येणे शक्य नसल्याने त्यांनी आत्महत्या केल्याची बोलले जात आहेत.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
रविवार दि.१० रोजी सकाळी ११ वाजता ही घटना लक्षात आली. याबाबत गोरे यांचे जावई भरत भाऊसाहेब भुजबळ यांनी आपल्या सासऱ्यांनी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती नगर तालुका पोलीस ठाण्यात दिली. पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, याबाबत पुढील तपास पोलीस करत आहेत.


-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.