साईबाबांच्या पादुका दौऱ्याविरोधात शिर्डी ग्रामस्थ व साईसंस्थान वाद उफाळणार ?

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  साईबाबा संस्थानच्या व्यवस्थापन मंडळाने बाबांच्या पादुका दौरा नियोजित दौऱ्यानुसार होणार असल्याचा निर्णय कायम ठेवल्याने शिर्डी ग्रामस्तांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ५ जानेवारीपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा शिर्डी ग्रामस्थांनी दिला आहे. यामुळे साईबाबा संस्थान व शिर्डी ग्रामस्थ यांच्यातील वाद उफाळून येण्याची चिन्हे दिसत आहे.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
साईबाबांच्या मुळ पादुका शिर्डी बाहेर नेऊ नये, अशी भूमिका शिर्डी ग्रामस्थांनी सुरुवातीपासून घेतली आहे. याबाबत झालेल्या बैठकीत मतमिन्नता असली तरी विरोध करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. पादुका दौऱ्यासंदर्भात साईबाबांच्या समाधीवर टाकलेल्या चिठ्ठ्यातही बाबांनी पादुका बाहेर नेऊ नये असा कौल दिला आहे.

चेन्नई येथे पादुका नेऊ नये यासाठी छत्रपती शासनच्या कार्यकर्त्यांनी संस्थानच्या निर्णयाविरोधात उपोषण सुरु केले होते. संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी याबाबत शिर्डीत येऊन ग्रामस्थांशी चर्चा करुन पुढील निर्णय घेणार असल्याचे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
संस्थानच्या झालेल्या बैठकीत संस्थान व्यवस्थापन मंडळाने याबाबत उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्य समिती स्थापन करुन शिर्डी ग्रामस्थांशी चर्चा करुन पादुका संदर्भात अहवाल सादर करावे, असे निश्चित केले. या समितीने संस्थान व्यवस्थापन मंडळाला संस्थानने पादुका दौरा नियोजनाप्रमाणे चालू ठेवावा, असा अहवाल दिला. तो अहवाल संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी स्वीकारला. 

याबाबत पत्रकार परिषदेत साईबाबांचा पादुका दौरा नियोजित कार्यक्रमानुसार होणार असल्याचे स्पष्ट केल्याने शिर्डी ग्रामस्थांत तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्रिसदस्य समितीने शिर्डी ग्रामस्थांनी चर्चा न करता परस्पर अहवाल सादर.केला असून पादुका दौऱ्यास आमचा विरोध यापुढे कायम राहील, अशी भूमिका शिर्डी ग्रामस्थांनी घेतली आहे. संस्थानने पादुका दौरा रद्द करावा; अन्यथा येत्या ५ जानेवारीपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. 


-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.