प्रशासनाचा आंधळा कारभार !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  टुरिस्ट व्हिसावर येणाऱ्या विदेशी नागरिकांनी अरणगाव येथे येऊन शासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमताने प्रशासनाला अंधारात ठेवून शासकीय परवानगी नसतानाही कमीत-कमी 50 कोटी रुपयांच्या बोगस जमिनी खरेदी केलेल्या असून, प्रशासनाच्या आंधळ्या कारभारात बोगस जमिनी खरेदी करणाऱ्यांवर व यात सामील असणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांवर चौकशी करुन कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दाद मिळत नसल्याची माहिती तराणा सिंग यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष मेहेत्रे, अभिनेत्री तराणासिंग उपस्थित होते.टुरिस्ट व्हिसावर नगरमध्ये येणाऱ्या नागरिकांनी शासनाची फसवणूक करत बोगस खरेदी केल्या आहेत. टुरिस्ट व्हिसावर येणाऱ्या कोणत्याही नागरिकांला कुठल्याही प्रकारची खरेदी करण्याचा अधिकार गृहमंत्रालय, एमएचए फॉरेनर डिव्हीजन देत नाही. तरीही शासनास अंधारात ठेवून कर्मचाऱ्यांशी लागेबांधे ठेवून खरेद्या ओढल्या जातात. 

तरी या बोगस खरेद्या करणाऱ्यांच्या खरेद्या रद्द कराव्यात. तसेच रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या नियमाप्रमाणे परदेशात राहणारे जे भारतीय नागरिक नाहीत. त्यांना देशामध्ये कुठलीही मालमत्ता प्लॉट, घर जमीन खरेदी करण्याचा अधिकार फॉरनेर विभाग देत नाही. त्यांना फक्त पर्यटन, मित्र, धार्मिक, योगा, अध्ययन सारख्या कामासाठी ताप्पुरता व्हिसा दिला जातो. म्हणजेच भारताला या व्यक्तींना नियम डावलून फसवले आहे. असे तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

तराणासिंग म्हणाल्या, अरणगाव येथे 12 ते 15 लाख रुपये गुंठा आहे. सर्व सामान्य माणूस 1 गुंठाही घेऊ शकत नाही. परंतु, परदेशी नागरिक कुठलेही परवानगी नसताना येथे बोगस जमिनी खरेदी करतात. अरणगाव येथे 151 देशांमधून विदेशी नागरिक येत असतात. टुरिस्ट व्हिसा हा फक्त 180 दिवसांसाठी दिला जातो. विदेशी नागरिक हे टुरिस्ट व्हिसा लावून जमीन खरेदी करतात. या संदर्भात आम्ही औरंगाबाद खंडपीठाकडे याचिका दाखल करणार असून, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंकडे यासंदर्भात चर्चा करणार आहोत. 

मेहेर बाबांच्या ट्रस्टीतील काही ट्रस्टीच्या कुटुंबातील अनेकांच्या नावे प्रॉपर्टी, काळे धन, करोडो रुपये रोख स्वरुपात युएसए वरुन अरणगावमध्ये आणतात. घोटाळा करण्यासाठी ते खोटे रहिवाशी दाखले जोडतात. खरेदी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना पैसे देऊन, एनए प्लॉट, फ्लॅट, एनए प्लॉट बांधकाम करतात. ट्रस्टमधील दोन ट्रस्टीचे नावे व त्यांच्या नातेवाईक कुटुंबीय यांच्या नावे सुमारे 80 ते 100 एकर बेनामी प्रॉपर्टी दाखविली आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
यापैकी दोन विदेशी नागरिक आहेत. त्यांना साथ देणारे सरकारी कर्मचारी यांची मोठी साखळी आहे. जी सरकारसाठी गंभीर बाब आहे. हे लोक ट्रस्टींच्या नातेवाईकांच्या नावावर बेनामी अवैध काळा पैसा देऊन खरेदी करून काळा पैसा लपवतात. 20 वर्षांपासून अशा टुरिस्ट व्हिसावर येणाऱ्यांनी राज्यात करोडो विदेशी नागरिकांनी टुरिस्ट व्हिसाचा गैरवापर आरबीआयचा पर्यटन हा हेतू डावलून खरेदी केल्या आहे. 

त्यासाठी एजंट व सरकारी कर्मचाऱ्यांची मोठी साखळी या घोटाळ्यामध्ये आजवर कार्यरत आहे. या कर्मचाऱ्यांना पैशाचे आमिष देऊन बोगस खरेदी करतात. जास्तीत-जास्त खरेदी रोख स्वरुपात केल्या जातात. कागदावर कमी खरेदी दाखवून त्या रकमेच्या कित्येक पट रक्कम या कामी मदत करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना वाटून बोगस खरेदी केली जाते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.