बाह्यवळण रस्त्यासाठी युवक आक्रमक,सोशल मिडीयाच्या माध्यमातून राज्य सरकारचेलक्ष वेधण्यासाठीचे प्रयत्न.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  विविध राज्यमार्गांना जोडणाऱ्या बाह्यवळण रस्त्याची दुरावस्था झालेली असतानाही राज्य सरकारचा सार्वजनिक बांधकाम विभाग ढिम्म आहे. याबद्दल वेळोवेळी आंदोलन करूनही कार्यवाही करण्याऐवजी पुढची तारीख देण्याची खेळी हा विभाग निष्काळजी पणाने खेळत आहे. त्याबद्दल संताप व्यक्त करण्यासाठी गुरुवारी (दि.३० नोव्हेंबर) निंबळक येथील रेणुका मातामंदिरामध्ये युवकांची बैठक झाली. त्यानुसार सोशल मिडीयाच्या माध्यमातून या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठीचे पुढील धोरण ठरविण्यात आले आहे.


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
अनेकदा आंदोलन करूनही बाह्यवळण रस्ताखड्डेमुक्त करण्यासाठीची कर्तव्यदक्षता राज्यसरकारसह आमदार-खासदार यांनीहीदाखविलेली नाही. याबद्दल तीर्व संताप व्यक्तकरीत सोशल मिडीयाच्या माध्यमातूननिंबळकसह परिसरातील तरुणांनी पुढाकारघेऊन ‘खड्डेमुक्त बायपास समिती’ची स्थापनकरून गुरुवारी सकाळी ही बैठक घेतली.

या नियोजनाच्या बैठकीसाठी परिसरातील सुमारे ४० तरुणांनी सहभाग घेऊन समितीच्याआंदोलनाची पुढील दिशा ठरविली. ‘फेसबुकलाइव्ह’च्या माध्यमातून शनिवारी (दि. २डिसेंबर) सकाळी १० वाजता सुमारे ५०० तरुणांच्या उपस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांचे लक्ष वेधले जाणार आहे. 

तसेच‘खड्डेमुक्त राज्या’ चा नारा देणारे सार्वजनिकबांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याही ‘फेसबुक पेज’ला ‘टॅग’ करून हे अभिनव आंदोलन केले जाणार आहे. या बैठकीत‘खड्डेमुक्त बायपास समिती’च्या अध्यक्षपदी दीपक शिरसाठ यांची सर्वानुमते निवड करण्यातआली. 

यावेळी कॉ. भैरवनाथ वाकळे, अँड.योगेश गेरंगे, संदीप शिरसाठ, महादेव गवळी, विजय कोतकर, अजय गेरंगे, राहूल ठाणगे, मच्छिंद्र म्हस्के, विकास घोलप, विकास गेरंगे, मयुर पाटोळे, सतिष निमसे, शेखर आंधळे, तुषार सोनवणे, रविंद्र पवार, गणेश भांड, प्रशांत म्हस्के, जालिंदर कोतकर, अरूण थिटे आदींसह मोठ्या संख्येने तरूण उपस्थित होते.

नेप्ती-विळद रस्त्याला छत्रपतींचे नाव

नगर शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्याउद्देशाने शहराच्या बाहेरून बाह्यवळण रस्तातत्कालीन कॉंग्रेस आघाडी सरकारच्या काळातमंजूर झाला होता. मात्र, त्यानंतर त्याची दुरुस्तीआणि देखभाल केली जात नसल्याने हा रस्ताखड्ड्यात गेला आहे. त्यालाच खड्ड्यातूनबाहेर काढण्यासाठीचा दबावगट तयारकरण्याच्या हेतूने ‘खड्डेमुक्त बायपास समिती’चीस्थापना केली आहे. तसेच नेप्ती ते विळददरम्यानच्या या रस्त्याला छत्रपती शिवाजीमहाराज यांचे नाव देण्यासाठीही समितीप्रयत्नात असल्याची माहिती अध्यक्ष दीपक शिरसाठ यांनी दिली

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.