लोणी येथे ७ डिसेंबरपासून ऊस उत्पादक संघर्ष समितीचे आंदोलन

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :उस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊस दराबाबत राज्यभर एकच धोरण ठरवून या हंगामात संपूर्ण राज्यात उसाला किमान ३ हजार ५०० रूपये पहिली उचल द्यावी, अन्यथा कारखान्यांचे धुराडे पेटू देणार नाही. साखरे वरून उसाचा भाव ठरवला जातो. तर तसे न करता उसावरून साखरेचा भाव ठरवण्यासाठी रणगंणात उतरून, राज्यात ज्यांनी सहकाराची मुहूर्तमेढ रोवली त्या सहकार महर्षी स्वर्गीय विठ्ठलराव विखे यांच्या लोणी येथील पुतळ्यासमोर ७ डिसेंबरला राज्यव्यापी बेमुदत उपोषण आंदोलन करणार असल्याचे ऊस प्रतिनिधींच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना डॉ. अजित नवले यांनी सांगितले. 


--------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS
----------------------------------
यावेळी शेतकरी संघटनेचे डॉ. अजित नवले यांच्या सहित बाळासाहेब पटारे, बन्सी सातपुते, अनिल देठे, संतोष वाडेकर,राजू आघाव, प्रा. सुभाष निकम, रोहिदास धुमाळ, नीलेश तळेकर, विलास कदम, संदीप कडलग व अखिल भारतीय किसान सभा, महाराष्ट्र राज्य किसान सभा, प्रहार शेतकरी संघटना, भूमिपुत्र शेतकरी संघटना, क्रांतिसेना शेतकरी आघाडी, संभाजी ब्रिगेड, युक्रांत, मराठा महासंघ, आदी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीसाठी अहमदनगर , बिड , सांगली , सातारा,कोल्हापुर , सोलापुर ,नासिक ,जालना आदि राजभरातील प्रमुख दहा उस उत्पादक जिल्हातील सुमारे २०० प्रतिनिधि उपस्थित होते . 

यावेळी नवले म्हणाले, राज्यव्यापी आंदोलनाची तयारी करण्यासाठी ३० नोव्हेंबर रोजी अहमदनगर येथे राज्यव्यापी तयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ऊस दराबाबत धोरण ठरविण्यासाठी व राज्यभरातील अन्याय झालेल्या सर्व कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हे उपोषण असणार आहे. उपोषणात राज्यभरातील शेतकरी नेते, कार्यकर्ते व शेतकरी सामील राहणार आहे. उपोषणाच्या पाठिंब्यासाठी राज्यभर आंदोलनाची हाक दिली आहे. या उपोषणापासून मोठ्या लढ्याची सुरूवात होणार आहे. रंगराजन यांच्या अहवालानुसार ७०-३० फॉम्र्युल्यानुसार एफआरपी आणि २०० रूपये देण्याचे ठरले. राज्यात ऊस दरवाढीसंदर्भात चुकीचा पायंडा पाडण्यात आला आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
राज्यात सर्व ठिकाणी एकच उचल दिली पाहिजे, ही आमची मागणी आहे. शेतकऱ्यांना आधारभूत, लाभदायी योजना मिळावी ही कायदेशीर तरतूद आहे. परंतु, राज्यातील नेत्यांनी त्याचा खात्मा केला आहे. पहिली उचल ३ हजार ५०० द्या, तरच कारखान्यांचे धुराडे पेटतील. नगरपासून हा लढा सुरु करण्यात येत आहे. त्यामुळे हा लढा राज्यव्यापी बनत चालला आहे. आज रोजी सर्जेपुरा येथील रेहमत सुलतान फाउंडेशन येथे राज्यातील ऊस प्रतिनिधींची बैठक पार पडली. यावेळी राज्यातील २०० प्रतिनिधी उपस्थित होते. 

आम्ही हे उपोषण शांततेच्या मार्गाने करणार आहोत. आम्ही हा लढा शांततेच्या मार्गाने लढणार आहोत. या उपोषणासाठी रीतसर परवानगी घेतली जाईल. यासाठी प्रशासनानेही आम्हाला परवानगी द्यावी, असे आवाहन पत्रकारांशी बोलताना नवले यांनी केले. नवले पुढे म्हणाले, वजनाच्या काट्यात जशी चोरी केली जाते. तशीच रिकव्हरी, घोरणात्मक विचारातही केली जाते. त्यामुळे या आंदोलनाच्यामार्फत आम्ही चोरी पण रोखू व दरोडेखोरीही रोखू. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या ५० टक्के नफा व शेतकऱ्यांना पहिली उचल ही ३ हजार ५०० रूपये मिळावी, अशी मागणी आंदोनात करण्यात आली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.