10 रुपयांच्या बिंड्यामधून दोन तासांची नशा; शहरातील युवक स्वस्त नशेच्या विळख्यात

दैनिक दिव्य मराठी :- पांगरमल घटनेच्या निमित्ताने शहरातील बनावट दारूचे मोठे रॅकेट नुकतेच उघड झाले. अनेकांचा या दारू कांडात बळी गेला. मात्र, सुस्तावलेल्या पोलिसांचे “बे’चे पाढे जैसे थेच सुरू आहेत. शहरातील युवकांना पोलिसांच्या डोळ्या देखत ‘बिंडा’ या अमली पदार्थाने विळखा घातला आहे. फक्त दहा रुपयांत तब्बल दीड ते दोन तासांची नशा होत असल्याने हजारो युवक “बिंडा’च्या विळख्यात अडकले आहेत. शहरातील कानाकोपऱ्यात लहान- मोठ्या टपऱ्यांमध्ये ‘बिंडा’ची राजरोसपणे विक्री सुरू आहे. मात्र, पोलिस बघ्याची भूमिका घेत असल्याने पालकांच्या जीवालाही घोर लागला आहे.

--------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS
----------------------------------
खिशात पैसा नसलेली व्यसनांच्या आहारी जात असलेली आजची युवा पिढी नशेसाठी दररोज नवीन उपाय शोधत आहे. नगर शहरात तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या हजारो युवकांनी अमली पदार्थ ‘बिंडा’चा आधार घेतला आहे. बिअर- दारूचा खर्च परवडत नसल्याने हे युवक दहा रुपयांची ‘बिंडा’गोळी चॉकलेट सारखी चाऊन नशेत तर्रर्र होत आहेत.

शहरातील पानटपऱ्यांवर खुलेआम हा बिंडा विकला जात आहे. पाच रुपयांपासून तर ३० रुपयांपर्यंत एका बिंडा गोळीची किंमत आहे. युवा पिढीसाठी हा खर्च किरकोळ असून त्यातून मिळणारी नशा त्यांना गुन्हेगारीकडे वळण्यास प्रवृत्त करत आहे. मध्यप्रदेश राज्यातून हा बिंडा नगरमध्ये दाखल होत असून त्याचे काही होलसेल डिलर देखील आहेत. मात्र, पोलिसांच्या अाशिर्वादाने हे डिलर शहरातील शेकडो टपऱ्यांना बिंडा पुरवत आहेत.

मणुका, पेढा, चॉकलेट, बाम अशा विविध नावाने हा बिंडा टपऱ्यांमध्ये सहज मिळतो. त्यास सर्वाधिक मागणी कामगार मजूर वर्गाची आहे. परंतु आता या वर्गात युवा वर्ग देखील सामील झाला आहे. महाविद्यालयात शिकत असताना दारू- बिअरचा खर्च खिशाला परवडणारा आहे. त्यामुळे हा वर्ग बिंडाकडे वळला आहे. त्यामुळे हजारो युवकांच्या आई- वडिलांच्या जीवाला घोर लागला आहे. पोलिस मात्र या बिंडा माफियांना अभय देत कोवळ्या युवकांच्या नशेचे पाप स्वत:च्या माथी मारून घेत आहेत.

- ५ ते ३० रुपये एका बिंडाची किंमत
- १३० ते १५० ठिकाणी बिंडाची विक्री
- १० ते १५ शहरातील मुख्य विक्रेते

४० हजार गोळ्यांची पेटी हजारांत
नगरशहरात येणारा बिंडा मध्यप्रदेश इंदौर येथून येतो. किरकोळ विक्रेत्यांच्या मागणीनुसार मोठे विक्रेते बिंडाची आर्डर देतात. सहा हजार रुपयांत बिंडाची एक पेटी परराज्यात मिळते. एका पेटीत बिंडा भरलेल्या १२ बरण्यांचे २४ थर असतात, त्यात तब्बल ४० हजार गोळ्या असतात. विशेष म्हणजे हा बिंडा वर्षभर खराब होत नाही.

माहिती घेऊन कारवाई
बिंडाया अंमली पदार्थाची शहरात विक्री सुरू आहे. याबाबत अद्याप कोणतीच तक्रार आलेली नाही. तक्रार आल्यानंतर आम्ही निश्चितच कारवाई करू. त्याचबरोबर याप्रकरणाची माहिती घेऊन लवकरच योग्य ती करवाई करण्यात येईल. - दिलीप पवार, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
कृष्णप्रकाश यांनी टाकला होता छापा
कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत बिंडाची सर्वाधिक विक्री सुरू आहे. तत्कालिन पोलिस अधीक्षक कृष्णप्रकाश यांनी जुन्या महापालिकेच्या समोरील परिसरात स्वत: छापा टाकून लाखो रुपयांचा गांजा बिंडा जप्त केला होता. मात्र, त्यानंतर या परिसरातील बिंडाची विक्री पुन्हा पूर्ववत सुरू आहे. केवळ हाच परिसर नाही, तर भिंगार, माळीवाडा, आशा टॉकीज, बसस्थानक परिसर, मुकूंदनगर आदी भागात बिंडाची राजरोसपणे विक्री सुरू आहे.

कुटुंब सक्षम हवे
कुटूंबव्यवस्था पूर्वीसारखी सक्षम राहिलेली नाही. अर्थिक, वैज्ञानिक प्रगती सुरू आहे. परंतु कुटुंब व्यवस्था लोप पावत आहे.चंगळवाद वाढल्याने तरुण मुले व्यसनाच्या आहारी जात आहेत. मुळात बिंडा सारखे नशेचे पदार्थ बाजारात उपलब्ध आहेत, हेच दुर्दैव आहे.
- डाॅ.बी. एच. झावरे, प्राचार्य, न्यू आर्टस्.

अशी घ्या काळजी...
- पालकांनी ठेवावे मुलांवर लक्ष
- मुलाच्या मित्रांची योग्य ती माहिती ठेवणे
- त्याच्या शाळा- महाविद्यालयांच्या वेळेची माहिती
- मुलगा क्लासला नियमित जातो का, याची खातरजमा करणे
- मुलगा खोटे बोलत आहे, असा संशय आल्यास विचारपूस करावी
- एखाद्या वेळी मुलाच्या कपड्यांची गुपचूप झडती घ्यावी
- मुलगा व्यसन करत असल्यास त्याला विश्वासात घेऊन प्रबोधन करावे

काय आहे बिंडा?
बिंडा हा अंमली पदार्थ असून तो भांग गांजापासून बनवला जातो. गूळ, बडीशेप, तसेच पानमसाल्यात वापरले जाणारे पदार्थ असतात. बिंडाची एक चॉकलेटसारखी गोळी खाल्यानंतर दीड ते दोन तास नशा रहाते. गंजबाजारात एका ठिकाणी गांजापासून बनवलेल्या विशेष बिंड्याच्या एका गोळीची िकंमत ३० रुपयांपर्यंत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.