शेतकरी गोळीबार प्रकरण : शेतकऱ्यांचा खटला मोफत लढविणार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शेवगाव तालुक्यातील खानापूर येथे दि.१५ नोव्हेंबर रोजी ऊस दरासाठी आंदोलन करणाऱ्या शेकऱ्यांवर पोलिसांनी गोळीबार केला. यामध्ये २ शेतकऱ्यांच्या छातीत गोळ्या लागल्या. ज्या शेतकऱ्यांच्या छातीत गोळ्या लागल्यावरही त्यांच्यावर पोलिसांनी ३०७ चा गुन्हा दाखल केला आहे. 
--------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS
----------------------------------
त्या गुन्हातील उध्दव मापारे, नारायण दुकळे या दोन शेतकऱ्यांचे वकीलपत्र विनामोबदला घेण्याचा निर्णय घेतला आहे. दि.२९ नोव्हेंबर रोजी जिल्हा कोर्टाने अंतरीम जामीन मंजूर केला आहे. सामाजिक भावनेमधून अ­ॅड.जय भोसले यांनी मॅक्स केअर हॉस्पिटलमध्ये जावून या जखमी शेतकऱ्यांची भेट घेऊन वकील पत्र स्वीकारले आहे. .
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
मुख्यमंत्री, पालकमंत्री, गृहमंत्री यांनी शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले असून, जखमी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचे आश्वासन सरकारने दिले. परंतु अद्याप रक्कम दिली नाही. याकडे लक्ष वेधणार असून, ज्यांनी शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या त्यांच्यावर न्यायालयात फिर्याद दाखल करून गुन्हे दालख करण्यासंबंधी कार्यवाही करणार आहे. या वेळी दवाखान्यात अ‍ॅड.जय भोसले, अजय महाराज बारस्कर, अ‍ॅड.राज भोसले, दत्ता झरेकर, दिगंबर भोसले आदी उपस्थित होते. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.