श्रीगोंद्यात शिवसेनेच्या नव्या जुन्यांचा वाद चव्हाट्यावर.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदा शिवसेनेत जुन्या व नव्या शिवसैनिकांमध्ये सुरू असलेला वाद चव्हाट्यावर आला. जुन्या शिवसैनिकांनी एकत्र येऊन आज श्रीगोंद्यात बैठक घेतली, या बैठकीत आपल्याला कोणत्याही नेत्याची गरज नाही. स्व.बाळासाहेब ठाकरे व शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हेच आपले नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या आदेशानेच यापुढे तालुक्यातील जुने शिवसैनिक काम करतील असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. 


--------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS
----------------------------------
तसेच घनशाम शेलार यांनी आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेत प्रवेश केला असून, त्यांनी शिवसेनेत आल्यापासून जुन्या शिवसैनिकांना विचारात न घेता त्यांना डावलून त्यांच्या मर्जीतल्याच लोकांना शिवसेनेची पदे वाटली असून त्यामुळे जुन्या शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. याच पार्श्वभूमीवर कुकडीच्या विश्रामगृहावर या जुन्या शिवसैनिकांची काल बैठक झाली.

यामध्ये नव्या शिवसैनिकांमुळे कोणताही जुना शिवसैनिक शिवसेना सोडणार नाही. कोणत्याही पदाशिवाय जुने शिवसैनिक पक्षासाठी पूर्णपणे योगदान देतील असा निर्णय झाला. दरम्यान ही नाराजगी शेलार यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार आहे या बैठकीसाठी नंदकुमार ताडे, संतोष शिंदे, बाळासाहेब दूतारे, यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

पक्षाविरोधात कारवाया करणाऱ्यांवर योग्य कारवाई .
अशा पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांवर जिल्हाप्रमुख व पक्षाचे नेते कारवाई करतील. आपण आज बैठकीसाठी मुंबईत असून, या संबंधित प्रकाराची पक्षाकडे तक्रार करणार आहोत. आमची दीडवर्षापूर्वी मातोश्रीवरून अधिकृत नियुक्ती पत्र देऊन तालुकाप्रमुखपदी निवड केली आह. जे अधिकृतच नाहीत तेच शेलार यांच्यावर चुकीचे आरोप करीत आहेत. ज्यांना भाजपने डावलले पण त्यांचा मुलगा भाजपमध्ये आहे. अशा लोकांना सेनेत स्थान नाही.त्यांच्यावर पक्षातील वरीष्ठ योग्य ती कारवाई जरूर करतील. - संजय आनंदकर, तालुकाप्रमुख. .

--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

संबंधितांना खुलासा मागणार, पक्षाकडे अहवाल सादर करणार .
श्रीगंद्यात आज ज्या शिवसैनिकांनी अशी बैठक घेतली, ती चुकीची आहे. घनशाम शेलार यांच्याबाबत त्यांची नाराजगी होती, तर त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे आधी तक्रार करणे गरजेचे होते. शेलार यांना विधानसभेचे उमेदवार म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी त्यांना प्रवेश दिला आहे. बाळासाहेब दूतारे यांना युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख पद दिले. पण त्यांनी किती शाखा उघडल्या, त्यांचे काम किती, तसेच या सर्वांना पत्र देऊन त्यांच्याकडे खुलासा मागणार असून. याबाबत पक्षाकडे अहवाल सादर करणार आहे. सदरची बैठक घेण्याचा प्रकार चुकीचाच आहे. .
- शशिकांत गाडे, शिवसेना अ.नगर जिल्हाप्रमुख.

शेलारांच्या स्वार्थी राजकारणामुळे जुने शिवसैनिक नाराज .
स्वताच्या स्वार्थी राजकारनासाठी घनशाम शेलार यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून, त्यांनी जुन्या शिवसैनिकांना डावलले आहे. जुन्या निष्ठावंताना डावलून त्यांनी त्यांच्या मर्जीतल्या लोकांना पदे वाटली आहेत. जुन्या शिवसैनिकांना ते जाणीवपूर्वक डावलत असून शेलार यांच्या नेतृत्वाची आम्हाला गरज नाही. आम्ही निष्ठावंत असून, स्वार्थी नेत्यांसाठी नव्हे तर फक्त पक्षाचे काम करणार आहोत. - बाळासाहेब दूतारे, युवासेना उपजिल्हाप्रमुख

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.