मॉडेल व्हिलेज गोरेगाव येथे शिवार फेरी तसेच जलव्यवस्थापन व स्वच्छता सभा संपन्न.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  पारनेर तालुक्यातील मॉडेल व्हिलेज गोरेगाव येथे जिल्हा परिषदेचे शासकीय कर्मचारी यांची शिवार फेरी तसेच जलव्यवस्थापन , व स्वच्छता सभा, संपन्न झाली या प्रसंगी जि.प.अध्यक्षा.मा.ना.सौ शालिनीताई विखे पाटील,उपाध्यक्षा राजश्रीताई घुले पाटील, जि. प.सभापती कैलास वाकचौरे,अजय फटांगरे,मा.सभापती तथा सदस्य हर्षदाताई काकडे, जि. प.सदस्य सुनीलभाऊ गडाख,काशीनाथ दाते, पुष्पाताई वराळ, तेजश्री लंघे , सुनिता खेडकर,पं. समिती सभापती राहुलभैय्या झावरे आदिंसह जिल्ह्यातील पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
यावेळी गोरेगावच्या विकासकामांची सर्व मान्यवरांनी पाहणी केली गावातील बॉटल पामची झाडे, सर्व रस्ते, स्वच्छता, जलसंधारणाची कामे, सुसज्ज ग्रामपंचायत पाहून सर्व मान्यवर भारावून गेले.एवढी लोकसंख्या असताना गाव एकसंघ ठेवणे व एवढ्या स्वरूपात निधी मिळवून अशी कामे करणे ही खूप मोठी आणि कौतुकास्पद गोष्ट आहे.राळेगणसिद्धी आणि हिवरे बाजारच्या तुलनेत गोरेगाव देखील आदर्श गाव योजनेत सहभागी होईल आणि नावारूपाला येईल, आम्ही सर्वजण गोरेगावला बक्षीस मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे मा.ना.सौ. शालिनीताई विखे पाटील म्हणाल्या. 

राजश्री ताई घुले पाटील यांनी गोरेगावचा विकास अतिशय चांगला झालाय, बंदिस्त गटार योजना, डिजिटल शाळा, सभागृह सर्व कामे दर्जेदार झाली असल्याचे गौरवोद्गार काढले. जि. प.मुख्य कार्यकारी अधिकारी माने साहेब यांनी सर्व कामाची पाहणी केली,गोरेगाव खरोखरच मॉडेल व्हिलेज आहे,नक्कीच इतर गावांनी गोरेगावचा आदर्श घेऊन विकासकामे करावीत असे मत यावेळी व्यक्त केले. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
गोरेगाव येथील खडकवस्ती प्राथमिक शाळा व गावठाणची जि.प. प्राथमिक शाळा या डिजिट शाळांचे उदघाटन जि. प.अध्यक्षा मा.ना. सौ.शालिनीताई विखे पाटील तसेच उपाध्यक्षा राजश्री ताई घुले पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी सभापती बाबासाहेब तांबे, सरपंच सौ.सुमन तांबे, उपसरपंच दादाभाऊ नरसाळे, चअेरमन भागुजी नरसाळे, मा.सरपंच सौ मीराबाई नरसाळे, व्हा.चेअरमन नाना तांबे, शिक्षक नेते बापूसाहेब तांबे, ग्रामविकास अधिकारी सौ.रोकडे टी. एन. ग्रा.पं.सदस्य आण्णा पाटील नरसाळे, संपत नरसाळे,वामन चौरे,
 वंदना नरसाळे, विठ्ठल नरसाळे, शोभा तांबे, अशोक नरसाळे,विकास काकडे, सोसायटी सदस्य बजु तांबे,रामदास नरसाळे व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. यावेळी संदीप तांबे यांनी सूत्रसंचालन केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.