आजी-माजी महापौरांच्या पतींमध्ये 'वाद'

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर शिवसेनेत गेले काही दिवस शमलेले अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून आले आहेत. उद्यान आणि योग केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमाचे नियोजन करतांना विश्‍वासात न घेतल्यामुळे आजी-माजी महापौर पतींमध्येच जोरदार खडाजंगी झाली.

--------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS
----------------------------------
महापालिकेने महावीर इंटरनॅशनल या संस्थेला योग केंद्रासाठी जागा उपलब्ध करुन दिली आहे. माजी सभागृह नेते अनिल शिंदे यांच्या प्रभागात ही जागा असल्यामुळे त्यांनी यासाठी पत्र दिले होते. त्यानुसार महासभेत ठराव होऊन जागा देण्याचा निर्णयही झाला. 

काल या जागेवर महावीर उद्यान व प्राणायम योगा केंद्राच्या भूमिपूजनाचाही कार्यक्रम पार पडला. मात्र, या कार्यक्रमाचे नियोजन करतांना अनिल शिंदे यांनाच विश्‍वासात घेण्यात न आल्याने शिंदे व माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांच्यात वाद उफाळून आला आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
सोमवारी सायंकाळी महापौर दालनातील चर्चेचे शाब्दिक वादात रुपांतर होऊन दोघांमध्ये जोरदार खडाजंगीही झाली. मनपातून बाहेर पडतांना ‘पाहून घेण्याचे’ इशारे देण्यापर्यंत हा वाद विकोपाला गेल्यामुळे याची चर्चा काल मनपात सुरु होती. गेल्या वर्षभरात सत्ताधारी शिवसेनेत अंतर्गत संघर्षातून अनेकवेळा वाद निर्माण झाले आहेत. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Blogger द्वारा समर्थित.