नगर-सोलापूर महामार्गावर भीषण अपघातात निंबळकमधील तीन व्यावसायिक जागीच ठार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  नगर-सोलापूर महामार्गावर मांडवगण फाटयाजवळ शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास झालेल्या मालट्रक व कारच्या भीषण अपघातात निंबळक (ता. नगर) येथील तीन व्यावसायिक जागीच ठार झाले,तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.या अपघातात कार चक्काचूर झाली आहे. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
भैरवनाथ गायकवाड (वय ४०), आत्माराम खरमाळे (वय २८)आणि जालिंदर भिल्लारे (वय ३८. सर्व रा. निंबळक, ता. नगर)अशी मयतांची नावे आहेत. या अपघातात महेश काळसे हा तरूण जखमी झाला. ट्रकने जोराची धडक दिल्याने कारचा चक्काचूर झाला. या कारमधील तिघेही जागीत गतप्राण झाले. या दुर्घटनेमुळे निंबळक गावावर शोककळा पसरली आहे. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.