माजी आमदार अनिल राठोड, डागवालेसह १८ जणांची सबळ पुराव्याअभावी मुक्तता

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर ओसामीबीन लादेनने केलेल्या हल्ल्याच्या समर्थनार्थ नगरमध्ये काढलेल्या मोर्चाच्या निषेध म्हणून प्रतिमोर्चा काढून लादेनचा प्रतिकात्मक पुतळा व पाकिस्तानी झेंडा जाळल्याच्या खटल्यातून शिवसेना उपनेते अनिल राठोड, किशोर डागवाले, सारंग पंधाडे, गणेश भोसलेसह १८ जणांची न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. 
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
या खटल्याची माहिती अशी की, दि. ११ सप्टेंबर २००१ रोजी अल कायदा या अतिरेकी संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याने अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर दहशतवादी हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर नगर शहरात काही समाजकंटकांनी लादेन समर्थनार्थ मोर्चा काढून लादेन झिंदाबादच्या घोषणा दिल्या होत्या. 

याच्या निषेधार्थ तत्कालीन आमदार व शिवसेना उपनेते अनिल राठोड तत्कालीन शहरप्रमुख किशोर डागवाले, माजी शहरप्रमुख गणेश भोसले, दीपक सूळ, अर्जुनराव दातरंगे, प्रकाश लोळगे, सागर चवंडके, शिवसेनेचे तत्कालीन भिंगार शहरप्रमुख बप्पा घुले, दत्तात्रय नागापुरे, मनोज गायकवाड, सारंग पंधाडे यांच्यासह सुमारे ४२ जणांनी लादेन व पाकिस्तान विरोधी तुफान घोषणाबाजी करुन शहरातून मोर्चा काढला होता. तसेच नेता सुभाष चौकात लादेनच्या प्रतिकात्मक पुतळ्यासह पाकिस्तान झेंड्याचे दहन केले होते. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
याप्रकरणी तोफखाना पेालिस ठाण्यात ४२ जणांविरुध्द भादंवि कलम १४३/१२० ब, मुंबई पोलिस कायदा ३७ (१) (३) १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याची सुनावणी नगरच्या न्यायालयातील मुख्य न्यायदंडाधिकारी आर.एम. कुलकर्णी यांच्यासमोर झाली. तब्बल १६ वर्षांनी या खटल्याचा निकाल लागला. या खटल्यातील आरोपींची संख्या ४२ होती. 

मात्र दरम्यानच्या काळात काहीजण मयत झाले. तर काही जणांना न्यायालयाने फरार घोषित केले होते. उर्वरित न्यायालयात हजर असलेल्या १८ जणांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. या खटल्यात आरोपींच्या वतीने ॲड. समीर लांडगे, ॲड. मंदार पळसकर, ॲड. संदीप डापसे, ॲड. एस.बी. रक्ताटे, ॲड. अजिंक्य काळे, ॲड. देशमुख यांनी काम पाहिले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.