ब्लॉग - गृहपाठ कमी पडतोय...

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :विधानसभा, राज्यसभा, लोकसभा, विधानपरिषद यामध्ये विरोधकां कडून नेहमीच कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर हमरीतुमरी होऊन अधिवेशन स्थगित केले जात आहे. विरोधक आपले कामे करीत असतात सत्ताधारी त्यातून मार्ग काढीत असतात. त्याची तंतोतंत अंमलबजावणी जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत आदींच्या सभांमध्ये तसेच होत आहे. 
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
अहमदनगर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा कोणत्या ना कोणत्या कारणावरून नेहमीच वादग्रस्त ठरत असते. सदस्यांकडून अधिकारी व पदाधिकार्‍यांवर तोफडागली जात असते. अनेकदा जिल्हा परिषदेची सभा तहकूब करण्याची वेळ आलेली आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत विरोधकांनी सत्ताधार्‍यांवर आरोप केले. आपल्याला सभेत बोलून दिले नाही, असा आरोप केला. 

हा आरोप करणे विरोधकांचे चुकीचे आहे. विशेष सभा फक्त काही मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी बोलविली जाते. ती सर्वसाधारण सभेसारखी नसते. तिला मर्यादा असता. ज्या कामासाठी ही सभा बोलविली जाते. त्याच विषयावर ती सभा होते. इतर विषयांसाठी सर्वसाधारण सभा असते. त्यामध्ये चर्चा केली जाते. मात्र विरोधकांनी मूळ मुद्दा सोडून देत इतर विषयांवर चर्चेचा हट्ट धरला. 

त्यामुळे मूळ विषय गोंधळात मंजूर होऊ गेलेले आहेत. त्यांचे प्रश्‍न तसेच राहिले. विरोधकांच्या या गदारोळाची मात्र चर्चा चांगली झाली. ज्या सदस्यांना आपल्या भागाचा विकास करण्यासाठी आपण निवडून दिले. त्यांना आपले कामच माहित नसल्याचे यातून उघड झाले. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सदस्यांबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इतर पदाधिकार्‍यांनी आता गृहपाठ करण्याची गरज निर्माण झालेली आहे. सर्वच सदस्यांनी आपले काय काम आहे, आपली कशासाठी नियुक्ती केलेली आहे. कोणत्या सभेत कोणता विषय चर्चेला गेला पाहिजे, कोणत्या विषयावर किती चर्चा केली पाहिजे, याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. 

हा गृहपाठ पक्का झाला तर त्यांच्याकडून कामे होतील. नाही तर मतदारांनी निवडून दिलेल्याचा पस्तावा त्यांना करावा लागणार आहे. जिल्हा परिषदेची सभा आटोपतील घेत असताना अध्यक्षांनी जी कारणे मांडली. ती चुकीची आहे. जनतेचे नेतृत्व करत असताना तसेच जिल्ह्याचे प्रमुख व्यक्ती म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांकडे पाहिले जाते. त्यांचे कुटुंब जिल्हा आहे. जिल्ह्याचे प्रश्‍न व्यक्तीगत प्रश्‍न अडचणींपेक्षा जास्त महत्वाचे आहे. 

त्यामुळे त्यांनी सभा गुंडाळताना जे मुद्दे मांडले ते मुद्दे जिल्हावासीयांना पटलेले नाही. त्यांनाही आपले पद व आपली कामे समजून घेण्याची गरज निर्माण झालेली आहे. अहमदनगर जिल्हा परिषदेत काही वर्षांपूर्वी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना त्यांच्या दालनात कोंडण्याचा प्रकार घडला होता. 
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
तसेच अधिकार्‍यांनाही कायम सदस्यांकडून होणार्‍या त्रासामुळे येथे अधिकारी येण्यास धजावत नाही. त्यामुळे सदस्यांनी अभ्यासपूर्वक आपली मते मांडणे गरजेचे आहे. जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय म्हणून ओळखले जाते. परंतु मंत्रालयात जसे आमदारांचे प्रश्‍नांची उत्तरे संबंधित खात्याचे मंत्री देतात, तसे अहमदनगर जिल्हा परिषदेत होत नाही. 

सदस्यांच्या प्रश्‍नांची उत्तरे येथे त्या खात्याचे सभापती देण्याऐवजी संबंधित विभागाचे अधिकारी देतात, मग जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय कसे म्हणायचे असा प्रश्‍न आता पडत आहे. मिनी मंत्रालयातील आता मुख्यमंत्री व इतर खात्याच्या मंत्र्यांनी आगामी काळात सदस्यांना उत्तरे द्यावे, अशीच अपेक्षा....

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.