ब्लॉग - ठाकरेंच्या मेळाव्याने सेनेला उभारी

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :यश आले की हुरळायचे नसते. अन् अपयशाने खचायचे नसते. मागील विधानसभा निवडणुकीत सेनेला अहमदनगर शहरात अपयश आल्याने शहरातील सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आली होती. सेनेला थंडावल्याने शहरात घड्याळाची टिकटिक वाढली होती. सेेनेचा जरी महापालिकेवर झेंडा फडकेला असला तरी विधानसभा मतदारसंघावरील राष्ट्रवादीच्या झेंड्याने शिवसैनिक अवस्थ होते. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
सेनेतील मरगळ हटण्यासाठी प्रयत्नशील होते. ही सर्वच मरगळीने काहीजण दूर जाऊ लागले होते. त्यामुळे सेनेच्या गोटात आणखीच अवस्था निर्माण होत होती. अपयशानंतरही शिवसेना उपनेते अनिल राठोड यांचे कार्य शहरात सुरु होते. तरी कार्यकर्त्यांमध्ये म्हणाव तसा हुरूप दिसून येत नव्हता. 

विधानसभेच्या यशानंतर मात्र राष्ट्रवादी काँग्रेसची शहरातील चलती वाढल्याने सगळीकडेच वातावरण राष्ट्रवादीमय झाले होते.शिवसेनेनेही आपली मरगळ झटकून महापालिकेच्या माध्यमातून विकासाची गंगा शहरात आणली होती. परंतु म्हणावे तसे सेनेचे कार्यकर्ते सक्रीय होत नसल्याने सगळ्यांपुढेच अडचणी उभ्या होत्या. 

शिवसैनिकांच्या मनाला व विचारांना लागलेली जळमटे युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या दौर्‍यामुळे  झटकली गेलेली आहे. आदित्य यांच्या दौर्‍यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये सावेडीतील युवा नेते रवी वाकळे यांच्यासह निवडक कार्यकर्ते सेनेत दाखल झाल्याने सेनेची ताकद वाढू लागलेली आहे. 

याच वेळी ठाकरे यांनी अहमदनगर शहर विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे उपनेते अनिल राठोडच उमेदवार राहणार असल्याीच घोषणा केल्याने कार्यकर्त्यांनी सेनेत प्रवेश केल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणीत झालेला आहे. सेना कार्यकर्ते आता जोमाने कामाला लागलेले आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
प्रत्येकजण आपला वारसदार निवड असतो. तसेच अनिल राठोड यांनीही आपला राजकीय वारस म्हणून विक्रम राठोड याची निवड केलेली आहे. विक्रम यांनी राजकारणात सक्रिय सहभाग घेतलेला असून ते आता कार्यक्रमांचे उत्कृष्ट नियोजन करून वडिलांचा वारसा पुढे चालविण्यासाठी कोणत्याही कार्यक्रमांमध्ये हिरहिरने सहभागी होत आहे. 

शहरातील युवा फळी विक्रम यांनी चांगली उभी केलेली असून युवा सेनेची शहरात चांगलीच बांधणी केलेली आहे. आदित्य ठाकरे यांच्या दौर्‍याच्या निमित्ताने शहरातील रेसिडेन्शियल शाळेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाची संपूर्ण धूराच त्यांनी संभाळली आहे. 

युवांचा कार्यक्रम असल्याने या कार्यक्रमाला अनुपस्थित राहून विक्रम यांच्यावर सर्व जबाबदारी सोपविली. यातून अनिल राठोड यांनी विक्रम याचे लाँचिंग सुरु केल्याचे दिसते आहे. यामुळे विक्रम यांना कामाला प्रोत्साहन मिळालेले असून पक्ष बांधणी व कार्यकर्त्यांना कसे संभाळायचे याचा धडाच त्यांना मिळालेला आहे. 

आदित्य ठाकरे यांचा दौरा फक्त अनिल राठोड यांच्यासह विक्रम राठोड व सेनेसाठी फलदायी ठरलेला आहे. आगामी काळात त्याचे परिणाम दिसायला लागतील. शहरातून मागील निवडणुकीत सत्यजित तांबे यांनी उमेदवारी केलेली आहे. त्यावेळी राष्ट्रवादी-काँग्रेस-सेना-भाजप यांच्यात लढत झाली. याचा फायदा राष्ट्रवादीला झालेला आहे. त्यामुळे आगामी काळात शहरातील राजकारण कसे वळण घेते, मतदार कोणाला पसंती देता, हे महापालिका व विधानसभा निवडणुकीतून दिसणार आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.