वाळूतस्कराने अल्पवयीन मुलीस पळवले,आई-वडील व ग्रामस्थांचे पोलिस ठाण्यासमोर उपोषण.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पारनेर तालुक्यातील शिरापूर येथील १६ वर्षांच्या मुलीला २७ नोव्हेंबरला आकाश प्रवीण उचाळे याने फूस लावून पळवून नेले. पोलिसांनी तपासात हलगर्जीपणा करत आरोपीला अटक केली नाही. त्यामुळे मुलीचे आई-वडील ५०-६० ग्रामस्थांनी गुरुवारी पोलिस ठाण्यासमोर उपोषण सुरू केले. 
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
आरोपीकडून मुलीच्या जीवितास धोका असल्यामुळे तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवण्यात यावा, अशी मागणी पालकांनी केली.आरोपी उचाळे हा वाळूतस्कर आहे. दरम्यान, आरोपीचा शोध घेण्यात तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक संजय मातोंडकर यांना अपयश आल्याने हा तपास आता पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र घुले यांच्याकडे दिला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक हनुमंतराव गाडे यांनी उपोषणकर्त्यांना दिली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.