'समृद्धी'त जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांचा नवीन जमिनीसाठी शोध!

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :समृद्धीच्या महामार्गासाठी संपादीत केलेल्या कोपरगाव तालुक्यातील १० गावातील शेतकऱ्यांना जवळपास ९२ कोटी ९६ लाख रुपये मोबदला मिळाल्यामुळे हे शेतकरी आता लगतच्या राहाता व कोपरगाव तालुक्यात दुसरी जमीन घेण्यासाठी शोध घेताना दिसत आहेत. समृद्धी महामार्गामुळे बाजारपेठेत आलेली ही रक्कम दोन तालुक्यातील आर्थिक व्यवहार वाढवण्यास मदत ठरत असल्याचे चित्र आहे. दोन्ही तालुक्याच्या खरेदी-विक्री कार्यालयात शेतकऱ्यांची लगबग दिसून येत आहे.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
जिल्हाधिकारी अभय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली समृद्धी योजनेकरिता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून कोपरगाव तालुक्यातील धोत्रे, डाऊच खुर्द, जेऊर कुंभारी, संवत्सर, भोजडे यासह आणखी पाच गावातील जमीन समृद्धी महामार्गासाठी संपादित केली जात आहे. खरेदी होताच जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत असल्याने शेतकरी आनंदात आहेत. 

यासाठी कोपरगाव तालुक्यातील १० गावातील जमिनीचे क्षेत्र ८ पदरी रस्त्यासाठी संपादित केले जात आहे. नागपूर ते मुंबई हा महामार्ग कोपरगाव तालुक्यातून जातो. त्या अंतर्गत एकूण ३१८ हेक्टर क्षेत्र संपादीत केले जाणार आहे. त्यापैकी ८० हेक्टर क्षेत्र संपादित केले आहे. उर्वरीत २३८ हेक्टर क्षेत्र संपादित करण्याचे काम जलद गतीने सुरू आहे. शेतकऱ्यांना तत्काळ रक्कम खात्यावर वर्ग केली जात आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
या गावातील शेतकरी लगतच्या राहाता, येवला, पुणतांबा या परिसरात आपल्या नातेवाइकांच्या माध्यमातून दुसऱ्या जमिनीचा शोध घेत आहेत. समृद्धी महामार्गामुळे बाजारपेठेत आलेली ही रक्कम दोन तालुक्यातील आर्थिक व्यवहार वाढवण्यास मदत ठरत असल्याचे चित्र आहे. भविष्यात या दोन तालुक्यात किमान ३०० कोटीच्या आसपास रक्कम जमीन मालकांच्या हातात पडणार असल्यामुळे बाजार पेठेत मोठी आर्थिक उलाढाल होईल. 

शेतकऱ्यांना बाजार भावाच्या ५ पट किंमत जमिनीसाठी तर झाडे, घर, विहीर व फळबागांसाठी अडीच पट रक्कम दिली जाते. हा मार्ग जलद गतीने पूर्ण होण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. नागपूर ते मुंबई या ८ पदरी रस्त्यामुळे दळणवळण जलद गतीने होणार आहे. रस्त्याचा फायदा भावी काळात विकासासाठी मोठ्या प्रमाणावर होणार आहे. उर्वरीत क्षेत्र संपादित करण्यासाठी प्राधान्याने कार्यवाही केली जात आहे.

याबाबत शिर्डी येथील प्रांत कार्यालयाकडे अधिक माहिती घेतली असता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून समृद्धी योजने अंतर्गत कोपरगाव तालुक्यातील १० गावातील ३१८ हेक्टर क्षेत्र यासाठी संपादित करण्याचे काम चालू असून त्यापैकी ८० हेक्टर क्षेत्र संपादित करून त्या पोटी ९२ कोटी ९६ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमिनी खरेदी केल्यावर तत्काळ वर्ग करण्यात आली असल्याची माहिती शिर्डी विभागाचे प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.