‘टायगर…’मधील दुसरे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :टायगर जिंदा है या चित्रपटातील पहिले गाणे ‘स्वॅग से स्वागत’ हे चाहत्यांच्या पसंतीस उतरले असून तुम्ही सलमान खान आणि कतरिना कैफचा कूल अंदाज पहिल्या गाण्यामध्ये पाहिला असेल. सलमान खान आणि कतरिना कैफ सुमारे ५ वर्षांनंतर एकत्र आले. त्यांचे चाहते त्यांच्यामधील रोमान्टिक अंदाज पाहण्यासाठी आतुर होते.

--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
सलमान – कतरिनामधील रोमॅन्टिक अंदाज पाहण्याचा चाहत्यांची इच्छा ‘दिल दिया गल्ला… या गाण्याद्वारे पूर्ण झाली आहे. झोया आणि टायगर यांच्यामधील केमेस्ट्री या गाण्यामध्ये चाहत्यांच्या भेटीला आली आहे.

आतिफ असलम याने दिल दिया गल्ला हे रोमॅन्टिक गाणे गायले आहे. टायगर जिंदा है चित्रपटातील गाण्यांना विशाल शेखर यांनी संगीतबद्ध केले आहे. टायगर जिंदा है चित्रपटाचा ट्रेलर, त्यापाठोपाठ आलेले चित्रपटातील ‘स्वॅग से स्वागत’ हे गाणं सुपर हीट ठरल्यानंतर ‘दिल दिया गल्ला’ हे गाणंदेखील चाहत्यांसाठी ट्रिट ठरणार आहे. २२ डिसेंबरला टायगर जिंदा है हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.