आफ्रिका विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :घरच्या मैदानावर २०१७ वर्षात बहुतांश प्रतिस्पर्ध्यांना पराभवाची धूळ चारल्यानंतर टीम इंडिया नवीन वर्षात नवीन आव्हानासाठी सज्ज झाली असून भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला ५ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघाचा या दौऱ्यात ३ कसोटी, ६ वन-डे आणि ३ टी-२० असा भरगच्च कार्यक्रम असणार आहे. बीसीसीआयने कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर केल्यानंतर आज एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे.
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
विराट कोहलीचे श्रीलंकेविरुद्ध मालिकेत विश्रांती घेतल्यानंतर एकदिवसीय संघात कर्णधार म्हणून पुनरागमन झाले आहे. याचसोबत मुंबईकर अजिंक्य रहाणेलाही राखीव सलामीवीराच्या भूमिकेत संघात जागा मिळाली आहे. परदेशी खेळपट्टीवर अजिंक्य रहाणेची कामगिरी लक्षात घेता त्याला संघात जागा मिळाल्याची शक्यता नाकारता येत नाही. याव्यतिरीक्त टी-२० मालिकेत चांगली कामगिरी करुनही लोकेश राहुलला आफ्रिकेविरुद्ध संघात जागा मिळू शकलेली नाही.

--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
तर दुसरीकडे श्रेयस अय्यर, मनिष पांडे आणि दिनेश कार्तिक यांनी संघात आपली जागा कायम राखलेली आहे. फिरकीपटू रविचंद्रन आश्विन आणि रविंद्र जाडेजाही संघात जागा मिळवू शकले नाहीयेत. या दोघांच्या जागी निवड समितीने युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या जोडीवर आपला विश्वास दाखवला आहे. याव्यतिरीक्त अक्षर पटेलचीही संघात निवड करण्यात आलेली आहे.

भारताचा एकदिवसीय संघ – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), शिखर धवन, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, केदार जाधव, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.